खचलेल्या जया प्रदा करणार होत्या आत्महत्या ! कठीण प्रसंगी फक्त अमर सिंह यांनी दिली होती साथ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सिनेमात अनेक वर्ष राज्य केल्यानंतर आता अभिनेत्री जया प्रदा राजकारणात जास्त सक्रिय आहेत. अभिनेत्री ते नेता बनलेली जया प्रदा यांनी एका त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. आयुष्यात वाईट काळात कोणी त्यांना साथ दिली, कधी त्यांना सुसाईड करावंही वाटलं होतं असे अनेक सिक्रेट तिनं सांगितले होते. आज आपण याचबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

 Jaya Prada

जया प्रदा यांनी सांगितलं होतं की, मला अनेकांनी मदत केली आहे. अमर सिंह जी (उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीचे माजी दिवंगत नेते) माझे गॉडफादर आहे. ते डायलिसिसवर असताना त्यांच्यासोबतचे माझे फोटो चुकीच्या पद्धतीनं पसरवले गेले. मी खूप रडले. मला जगण्याची इच्छा होत नव्हती. आत्महत्या करावी वाटत होतं. मला याचा धक्का बसला होता की, कोणीच माझा समर्थन केलं नाही. नंतर डायलिसिसवर वरून आल्यानंतर फक्त अमर सिंह जी माझ्या बाजूनं उभे होते.” 2009 साली जया प्रदा यांनी आझम खानवर अश्लील फोटो पसरवण्याचा आरोप केला होता.

 Jaya Prada

त्या असंही म्हणाल्या होत्या की, आझम खान माझ्यावर अ‍ॅसिड हल्ला करू शकतात. जेव्हा मी घरातून बाहेर पडत असे तेव्हा आईला मी परत येईन की, नाही हे सांगू शकत नसे. इतकचं नाही तर त्या कठिण प्रसंगी पक्षप्रमुख असणाऱ्या मुलायम सिंह यादव यांनी जया प्रदा यांच्याशी एकदाही चर्चा केली नव्हती. फक्त अमर सिंह आपल्यासाठी लढले असंही त्या सांगतात. 2004 आणि 2009 मध्ये जया यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली आणि विजय देखील मिळवला होता.

 Jaya Prada

जया प्रदा यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर जया यांनी 1986 मध्ये प्रोड्यसर श्रीकांत नाहटा सोबत लग्न केलं. जया श्रीकांतची दुसरी पत्नी होती. त्यावेळी या लग्नानं खूप राडा झाला होता. कारण श्रीकांतनं पत्नी चंद्राला घटस्फोट दिला नव्हता. तरीही यांचं लग्न झालं होतं. नंतर दोघींमध्ये सहमती झाली आणि जया आणि चंद्र सोबत राहू लागल्या. जयासोबत लग्न केल्यानंतरही श्रीकांतला चंद्राकडून मुलं आहेत. श्रीकांत आणि चंद्रा यांची 3 मुलं आहेत. मात्र जया आणि श्रीकांत यांना मूल नाही. एका मुलाखीत त्यांनी मुलाचीही इच्छा बोलून दाखवली होती.

 Jaya Prada