Samriddhi Highway Bus Accident | मोठी दुर्घटना! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – Samriddhi Highway Bus Accident | बुलढाण्यात (Buldhana News) मोठी दुर्घटना घडली आहे. बुलढाण्यामध्ये एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Samriddhi Highway Bus Accident) झाल्याची घटना घडली. या अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू (25 Passengers Died) झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले असल्याची माहिती आहे. ही दुर्घटना कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक (Emergency Medical Services Team) तसेच अग्निशमन दल (Fire Brigade) त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात (Samriddhi Highway Accident) झाला. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला (Nagpur To Pune) निघाली होती. ही घटना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याकडे जात होती. त्यावेळी हा अपघात घडला. या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या 33 प्रवाशांपैकी 8 प्रवासी सुखरुप बाहेर पडले.

 

दरम्यान, सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात (Government Hospitals) नेण्यात आले आहे. बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली. त्यानंतर ही बस रस्ता दुभाजकाला धडकली. त्यानंतर बस पलटी झाली. बसचा दरवाजा गाडीखाली आल्याने कोणालाच बाहेर येता आले नाही. वाचलेले प्रवासी गाडीच्या काचा फोडून बाहेर आले.

 

मृतदेहांची ओळख पटवणे अडचणीचे…

अपघातानंतर (Accident) रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बसमधील डिझेल सांडले आहे. त्यामुळे एक तर डिझेल टॅंक (Diesel tank) फुटली असावी किंवा डिझेल टॅंक मधून इंजिनकडे सप्लाय होणारा पाईप फुटला असावा, त्यामुळेच बसने पेट घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जे लोक काचेची खिडकी हाताने फोडून बाहेर निघू शकले त्यांचा जीव वाचला आहे. बसमधून 25 मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले आहेत. परंतु त्यांची ओळख पटवणे अडचणीचे होत आहे. (Samriddhi Highway Bus Accident)

 

मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर…

या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी (Collector of Buldhana) आणि पोलीस अधिक्षकांशी (SP) दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

 

या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत.

 

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

ही दुर्घटना कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

 

 

Web Title :  Samriddhi Highway Bus Accident | major accident of passenger bus in buldhana 25 passengers died

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा