Actress Katrina Kaif | कतरिना कैफची ‘जी ले जरा’ चित्रपटातून एक्झिट; प्रियंका चोप्रानंतर कतरिना प्रोजक्टमधून बाहेर

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा बहुचर्चित चित्रपट ‘जी ले जरा’ (Jee Le Jara) यामधून एकएक अभिनेत्री बाहेर पडताना दिसत आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Actress Priyanka Chopra Jonas ), अभिनेत्री कतरिना कैफ (Actress Katrina Kaif) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Actress Alia Bhatt) अशा मल्टीस्टारर सिनेमा मध्ये तगडी स्टारकास्ट घेण्यात आली होती. जोया अख्तर व फरहान अख्तर यांच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात प्रियंका, कतरिना व आलिया या बड्या अभिनेत्रींची वर्णी लागली होती, मात्र आता प्रियंका नंतर कतरिनाने (Actress Katrina Kaif) देखील या चित्रपटाला रामराम ठोकला आहे.

फरहान अख्तर (Farhan Akhtar) व जोया अख्तर (Zoya Akhtar) यांचा ‘जी ले जरा’ सिनेमामध्ये घेण्यात आलेल्या कलाकारांमुळे हा चित्रपट खूप चर्चेत होता. प्रेक्षकही प्रियंका, करतिना व आलिया या अभिनेत्रींना एकत्र स्क्रिन शेअर करताना पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र या सिनेमातून अभिनेत्री प्रियंका चोप्रा बाहेर पडली. चित्रपटाच्या कामाला आणि चित्रिकरणाला जास्तच विलंब होत असल्याने प्रियंकाने जी ले जरा चित्रपटाला रामराम ठोकला. (Katrina Kaif Movies) आता अभिनेत्री कतरिना कैफ हिने देखील चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. कतरिनाने का या चित्रपटाचे काम नाकारले याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र या दोघींनंतर बॉलीवुडच्या (Bollywood) आणखी दोन प्रसिद्ध अभिनेत्रींची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

अभिनेत्री प्रियंका आणि कतरिनाच्या (Actress Katrina Kaif) ऐवजी ‘जी ले जरा’ या सिनेमामध्ये अनुष्का शर्मा (Anushka Sharma) व कियारा आडवाणी (Kiara Advani) या अभिनेत्रींना घेतले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. आता यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट, कियारा आडवाणी व अनुष्का शर्मा अशी स्टार कास्ट असणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाबाबत उत्सुकता असली तरी निर्मात्यांकडून चित्रपट बनवण्यात दिरंगाई केली जात आहे. या कारणामुळेच प्रियंका चोप्रा प्रोजक्टमधून बाहेर पडली असून आता कतरिना कैफने ही ‘जी ले जरा’ या चित्रपटाला रामराम ठोकला आहे.

Web Title :   Actress Katrina Kaif | after priyanka chopra katrina kaif also exits from farhan akhtar jee le zara anushka sharma and kiara advani would replace them

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा