Actress Kriti Sanon | आदिपुरुषमुळे ट्रोल झालेल्या क्रितीने याआधी नाकारले आहेत ‘हे’ सिनेमे; अनेक दिग्गज कलाकारांना दिला नकार

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनॉन (Actress Kriti Sanon) ही तिच्या आदिपुरुष चित्रपटामुळे (Adipurush Movie) चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या ॲक्टिंगवरुन तिला ट्रोल केले जात आहे. 2014 साली अभिनेत्री क्रितीने हीरोपंती चित्रपटातून (Heropanti Movie) टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सोबत बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. आजपर्यंत क्रितीने (Actress Kriti Sanon) अनेक सिनेमे केले आहेत. त्यातील काही हीट ठरले तर काही फ्लॉप ठरले. मात्र असेही अनेक चित्रपट आहेत ज्यांना क्रितीने नकार दिला आहे. यामध्ये तिने बॉलीवुडच्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्यास नकार दिला (Kriti Sanon Rejected Movie) आहे. अनेक हिट चित्रपटात क्रितीला झळकण्याची संधी मिळत होती. मात्र तिने नकार दिला.

सिंह इज ब्लिंग (Singh Is Bliing) – अभिनेता अक्षय कुमारचा (Actor Akshay Kumar) 2015 साली रिलीज झालेला या सिनेमामध्ये कृती सेनॉनला घेण्यात आले होते. मात्र चित्रपटाचे चित्रिकरण अतिशय हळू चालू असल्याने क्रितीने यामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर मॉडेल असलेली अभिनेत्री एमी जैक्सन (Amy Jackson) हिच्याकडे हा प्रोजेक्ट केला. त्यानंतर हाऊसफुल 4 (Housefull 4) व बच्चन पांडे (Bachchan Pandey) या सिनेमांमध्ये अक्षय कुमार व क्रितीने स्क्रीन शेअर केली.

हाफ गर्लफ्रेंड – 2017 साली आलेला अभिनेता अर्जुन कपूरचा (Actor Arjun Kapoor) हिट चित्रपट ‘हाफ गर्लफ्रेंड’ (Half Girlfriend) या मध्ये ही निर्माते अर्जुनसोबत क्रितीला घेण्याच्या प्रयत्नात होते. मात्र क्रितीकडे इतर प्रोजेक्ट असल्याने तिच्या डेट जुळत नव्हत्या. यामुळे क्रितीला नकार द्यावा लागला. त्यानंतर तिच्या जागी श्रद्धा कपूरला (Shraddha Kapoor) घेण्यात आले. चित्रपट हिट झाला व क्रितीच्या हातातून एक हिट चित्रपट गेला. नंतर क्रिती आणि अर्जुनने ‘पानिपत’ चित्रपटात (Panipat Movie) एकत्र काम केले.

लस्ट स्टोरीज (Lust Stories) – करण जोहरने दिग्दर्शित (Director Karan Johar) केलेला सुपरहिट ओटीटी चित्रपट ‘लस्ट स्टोरी’ मध्ये अभिनेत्री क्रितीने काम करावं अशी अपेक्षा करणची होती. मात्र चित्रपटात असणारे अति बोल्ड सीन आणि इंटमेट सीन यामुळे क्रितीच्या आईने तिला हा चित्रपट करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे क्रितीने हा प्रोजेक्ट सोडला. त्यानंतर कियारा अडवाणीने (Kiara Advani) यात काम केले आणि ती प्रकाशझोतात आली.

मलंग (Malang) – आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) व दिशा पाटनी (Disha Patani) यांच्या बहुचर्चित थ्रिलर चित्रपट मलंगमध्ये क्रितीला काम करण्याची संधी मिळाली होती. 2020 साली रिलीज झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी (Director Mohit Suri) यांनी केले होते. या चित्रपटासाठी मोहित यांची पहिली पसंत क्रिती सेनॉन होती. त्याचवेळी क्रितीकडे पानिपत आणि हाऊसफुल 4 चे काम होते, त्यामुळे तारखांची समस्या येत होती. यामुळे क्रितीने मलंग चित्रपटाला नकार कळवला.

धमाका – 2021 साली रिलीज झालेला ‘धमाका’(Dhamaka) या चित्रपटात निर्मात्यांती पहिली पसंत अभिनेत्री क्रिती सेनॉन होती. सुरुवातीला या चित्रपटासाठी क्रितीसोबत बोलणे चालू होते मात्र अचानक अज्ञात कारणामुळे क्रिती यामधून बाहेर पडली. निर्मात्यांनी या OTT चित्रपटात पत्रकाराची मुख्य भूमिका साकारण्यासाठी कार्तिक आर्यनची (Kartik Aaryan) निवड केली.

हसीन दिलरुबा – 2021 साली OTT वर प्रदर्शित झालेला चित्रपट हसीन दिलरुबा (Haseen Dillruba) साठी निर्माता-दिग्दर्शक आनंद एल राय (Aanand L. Rai) यांनी क्रिती सेनॉनशी बोलणी केली होती. आधी क्रितीने (Actress Kriti Sanon) या चित्रपटासाठी होकार दिला होता मात्र, या चित्रपटातील बोल्ड सीन्समुळे ती यातून बाहेर पडली. त्यानंतर तापसी पन्नूने (Taapsee Pannu) चित्रपटात एन्ट्री घेतली. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आता त्याचा सिक्वेल येणार आहे.

Web Title :  Actress Kriti Sanon | kriti sanon said no to bollywood films like half girlfriend haseen dilruba

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Actress Kajal Aggarwal | दाक्षिणात्य अभिनेत्री काजलने शेअर केली रकुल प्रित सिंग, समंथा आणि तमन्नासाठी खास स्टोरी

Buldhana Bus Accident | ‘…ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे’, संजय राऊतांच्या टीकेला राणा दाम्पत्याचे प्रत्युत्तर

Top Monsoon Getaways near Pune: Explore Nature’s Beauty and Adventure

CM Eknath Shinde | ‘वाढते अपघात लक्षात घेता, भविष्यात आवश्यक ते सर्व केले जाईल’, बुलढाणा अपघातस्थळाच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

Uddhav Thackeray on Buldhana Accident | या अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत, बुलढाणा दुर्घटनेवरुन उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

Disha Patani | अवॉर्ड नाईटमधील रिव्हिलिंग ड्रेसने दिशा पाटनीवर खिळल्या नजरा; चाहत्यांनी केल्या कमेंटस्