Actress Madhuri Dixit | धकधक गर्ल माधुरी दीक्षितने नाकारलेल्या एका ऑफरमुळे दुसरी ‘ही’ अभिनेत्री झाली रातोरात स्टार

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची धकधक गर्ल असणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Actress Madhuri Dixit) हिने अनेक पिढ्यांचे मनोरंजन केले आहे. तिने अनेक चित्रपट गाजवले आहेत तर अनेक चित्रपटांच्या ऑफर धुडकावल्या आहेत. अभिनेत्री माधुरीने (Actress Madhuri Dixit) अशीच एक ऑफर नाकारल्यामुळे दुसऱ्या अभिनेत्रीचे करिअर बनले गेले. या चित्रपटाची ऑफर स्विकारल्यामुळे रातोरात ती अभिनेत्री स्टार झाली.

काही वर्षांपूर्वी अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor), जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि अभिनेत्रा मनिषा कोइराला (Actress Manisha Koirala) यांचा 1942: अ लव्ह स्टोरी (1942: A Love Story) हा चित्रपट आला होता. दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा (Director Vidhu Vinod Chopra) दिग्दर्शित या चित्रपटातील ‘एक लड़की को देखा…’ (Ek Ladki Ko Dekha Song) हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मुखी असते. मात्र दिग्दर्शकांना हा चित्रपट अभिनेत्री माधुरी दिक्षित आणि अभिनेता अमीर खानसोबत करायचा होता. यावेळी हे स्टार यशाच्या शिखरावर होते. त्यांची जोडीही प्रेक्षकांना खूप आवडत होती. मात्र अमीर आणि माधुरीने तारखा उपलब्ध नसल्याची कारणं देत हा चित्रपट नाकारला. त्यांच्या जागी अनिल कपूर आणि मनिषा कोइराला यांना घेण्यात आले. प्रदर्शनानंतर हा चित्रपट खूप गाजला आणि अभिनेत्री मनिषा रातोरात स्टार झाली. चित्रपटातील आर डी बर्मन यांची गाणीही खूप हीट झाली.

चित्रपटातील सर्वात गाजलेले ‘एक लड़की को देखा…’ हे गाणे खास माधुरीसाठी बनवण्यात आले असल्याचे दिग्दर्शक विधू चोप्रा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले. अभिनेत्री मनिषा कोइराला हीने आधीच या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. मात्र ती इंडस्ट्रीमध्ये नवखी होती. त्यामुळे तिला रिजेक्ट करण्यात आल होतं. माधुरीने (Actress Madhuri Dixit) नकार दिल्याने ही ऑफर मनिषाला मिळाली आणि तिने या संधीचे सोने केले. हिट झालेलं गाणं माधुरीच्या जरी सौंदर्यावर लिहिण्यात आलं असलं तरी मनीषाच्या निखळ सौंदर्यामुळं हे गाणं सुपरहिट ठरले.

Web Title : Actress Madhuri Dixit | throwback when madhuri dixit rejected the a love story 1942 movie then manisha koirala became superstar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा