ICC World Cup 2023 | वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहिर, कोणत्या स्टेडियममध्ये आणि कधी रंगणार भारत-पाकिस्तान सामना?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारताच्या यजमान पदाखाली खेळवल्या जाणाऱ्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे (ICC World Cup 2023) वेळापत्र आयसीसीकडून जाहीर करण्यात आले. मंगळावारी (दि.27) सकाळी मुंबईत आयोजित एका विशेष कार्यक्रमात विश्वचषक 2023 चे वेळापत्रक (ICC World Cup 2023) जाहीर करण्यात आले. वेळापत्रक जाहीर (Cricket World Cup 2023 Schedule) करण्यापूर्वी बीसीसीआयने (BCCI) त्यांच्या 12 राज्य संघटनांना बोलावून घेतले होते जेथे विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत. या विश्वचषकात 10 संघ सहभागी होणार आहेत.

2019 च्या अंतिम फेरीच्या पुनरावृत्तीसह 5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाला सुरुवात होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना होणार आहे. यजमान संघ भारत 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे. तर भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन देशांतील (India vs Pakistan) सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर 15 ऑक्टोबर 2023 रोजी खेळवला जाणार आहे. (ICC World Cup 2023)

प्रत्येक संघ राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये (Round Robin Format) इतर नऊ संघांशी खेळेल ज्यात अव्वल चार संघ बाद फेरी आणि उपांत्या फेरीसाठी पात्र ठरतील. पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी होईल. तर अंतिम सामाना रविवारी 19 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबाद येथे होईल.

विश्वचषकातील भारताचे सामने

1. 8 ऑक्टोबर – भारत वि. ऑस्ट्रेलिया (चेन्नई) India Vs. Australia
2. 11 ऑक्टोबर – भारत वि. अफगाणिस्तान (दिल्ली) India Vs. Afghanistan
3. 15 ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान (अहमदाबाद)
4. 19 ऑक्टोबर – भारत वि. बांगलादेश (पुणे) India Vs. Bangladesh
5. 22 ऑक्टोबर – भारत वि. न्यूझीलंड (धर्मशाला) India Vs. New Zealand
6. 29 ऑक्टोबर – भारत वि. इंग्लंड (लखनौ) India Vs. England
7. 2 नोव्हेंबर – भारत वि. क्वालिफायर 2 (मुंबई) India Vs. Qualifier 2
8. 5 नोव्हेंबर – भारत वि. दक्षिण आफ्रिका (कोलकाता) India Vs. South Africa
9.11 नोव्हेंबर – भारत वि. क्वालिफायर 1 (बंगळुरू) India Vs. Qualifier 1

Web Title : ICC World Cup 2023 | icc odi world cup schedule announce match schedule announced for the icc mens cricket world cup 2023 india pakistan match on october

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा