Actress Priya Bapat | प्रिया बापटने केली होती ‘ही’ एक चूक, आईने काढलं घराबाहेर

पोलीसनामा ऑनलाइन – मराठी सिनेविश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (Actress Priya Bapat) हि नेहमी चर्चेत असते. अभिनेत्री प्रिया बापटने अनेक हिट चित्रपट दिले असून सिनेमा, नाटक, वेबसिरीज यांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. अभिनेत्री प्रिया बापट ही सध्या तिच्या सिटी ऑफ ड्रीम्स (City of Dreams) या वेबसिरीजमुळे चर्चेत आली आहे. या आधी या सिरीजचे दोन भाग प्रदर्शित झाले होते. आता तिसऱ्या भागाला ही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. प्रियाने आता तिच्या आयुष्यातील एका चुकीची आणि त्यामुळे आईनी दिलेल्या शिक्षेची आठवण शेअर केली आहे.

अभिनेत्री प्रिया बापटने एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने हा प्रसंग शेअर केला आहे. प्रियाने ज्या एका चुकीमुळे तिला घराबाहेर ठेवण्यात आले तो बालपणीचा हा किस्सा सांगितला आहे. मुलाखतीमध्ये तिने अनेक पर्सनल लाईफमधील किस्से सांगतिले. अभिनेत्री प्रिया बापटचे बालपण हे दादरच्या (Dadar) चाळीमध्ये गेले आहे. चाळीतील आपुलकीविषयी आणि राहणीमानाविषयी अनेकदा प्रिया बोलत असते. आजही तिला चाळ ही खूप आवडते असे ती सांगते.

मुलाखती दरम्यान बालपणीची चाळीतील आठवण तिने सांगितली आहे. प्रिया म्हणाली की, आम्ही नेहमीच आमच्या घराच्या समोर चौक होता तिथे खेळायला जायचो. सगळीच लहान मुलं त्या जागी खेळायला यायची. तेव्हा आम्हांला आईने घालून दिलेला एक नियम होता की संध्याकाळी साडे सात वाजले की घरी निघून यायचं आणि हातपाय धुवून , देवापुढे प्रार्थना म्हणून, 8 वाजता जेवायला बसायचं. हे सगळं ठरलेलं होतं. पण एके दिवशी मी आणि माझी बहीण बॅटमिंटन खेळत होतो. आम्ही आलो नाही म्हणून आमची आई घरी चला म्हणून आम्हाला बोलवायला आली. पण आम्ही खेळण्यात एवढे गुंग झालो की आईला म्हणालो आलो 5 मिनिटांत. आणखी 5 मिनिटं आणखी 5 मिनिटं असं करत 8 वाजले. मग आम्हाला जाणीव झाली आता काही आपलं खरं नाही.’

ती पुढे म्हणाली की, ‘घरी जायला उशीर तर झालाय पण आता का करायचं. गुपचूप घरी गेलो. तर आईने आम्हाला शिक्षा म्हणून दराबाहेरच उभं केलं. दाराला कडी लावली आणि वर म्हणाली, ‘मी तुम्हाला म्हणालेले ना घरी चला. आता राहा बाहेरच कुणी जेवण देतं का बघा.’ त्यावर आम्ही अगदी रडकुंडीला आलो. खूप वेळ बाहेर उभे राहिलो मग शेवटी आईने आम्हाला घरात घेतलं.

अभिनेत्री प्रिया बापटने (Actress Priya Bapat) बालपणीचा हा मज्जेशीर किस्सा शेअर केला.
तिचा हा मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
तिची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसिरीज सर्वत्र गाजत असून तिच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे.
प्रिया आणि तिचा पती उमेश कामत (Umesh Kamat) यांची जोडी देखील प्रेक्षकांना आवडत असून त्यांचे अनेक
फोटो आणि रिल्स् सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
प्रियाने या आधी मुन्ना भाई एमबीबीएस (Munna Bhai MBBS), लोकमान्य (Lokmaya), वजनदार (Vazandar), आम्ही दोघी (Aamhi Doghi), काकस्पर्श (Kaksparsh), टाईमपास 2 (Timepass 2), टाईम प्लिज (Time Please) या चित्रपटात काम केले आहे.

Web Title : Actress Priya Bapat | priya bapat shared memory about her childhood in dadar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा