Actress Shivali Parab | हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवालीचा शॉर्ट कपड्यातील लूकवर चाहत्यांची नाराजी, होत आहे ट्रोलिंग

पोलीसनामा ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) यातील लोकप्रिय अभिनेत्री शिवाली परब (Actress Shivali Parab) ही सध्या ट्रोल होत आहे. विनोदातील अचूक टाईमिंग आणि अभिनयाच्या बळावर तिने लोकप्रसिद्धी मिळवली असून घराघरात ती लोकप्रिय आहे. शिवालीचे साधीभोळी राहणीमान आणि अस्सल अभिनयामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. मात्र आता अभिनेत्री शिवालीने (Actress Shivali Parab) शॉर्ट कपडे घालून फोटोशुट केल्यामुळे चाहते नाराज झाले असून तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

अभिनेत्री शिवाली परबने अनेक भूमिका गाजवल्या आहेत. तिचा जीवंत अभिनय प्रेक्षकांना भावत असून तिला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. शिवाली तिथे ॲक्टिव्ह असून आपल्या लाईफ अपडेट्स शेअर करत असते. नुकतेच तिने सिल्व्हर रंगाच्या वन पीस मधील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये शिवाली अत्यंत सुंदर व मादक दिसत आहे. मात्र नेटकऱ्यांना तिचा हा लुक आवडला नसून चाहते तिला छोट्या कपड्यावरुन ट्रोल करत आहेत. अनेकांनी तिला कमेंट करुन तू अजून हिरोईन झाली नाहीस आत्ताच असे कपडे घालायला असे खडे बोल सुनावले आहेत. (Shivali Parab In One Piece)

शिवालीच्या या नव्या वेस्टर्न आउटफिटमधील (Shivali Parab In Western Outfit) फोटो खाली नेगेटिव्ह कमेंट येत आहेत. एका चाहत्याने कमेंट केली आहे की,जेवढा पैसा जास्त तेवढे कपडे कमी होतात का ? तर आणखी एकाने लिहिले आहे की, काय वेशभुषा आहे तुझी. सुधर जरा. अजून तू एक्ट्रेस नाही आहेस. लोकं मनातून कळायच्या आधी स्वत: सावरुन घे. शिवालीच्या (Actress Shivali Parab) एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे की, साधी सिंपल छान दिसते. त्यामुळे तुला फॉलो केले होते. आता हे बघून अनफॉलो करत आहे.

Web Title :  Actress Shivali Parab | maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab fans angry after see her new look photoshoot

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा