#MeToo द्वारे नाना पाटेकरांवर आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता करतेय ‘कमबॅक’, घटवलं 15 किलो वजन !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) हिनं अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. हॉर्न ओके प्लीज (Horn Ok Please) या सिनेमाच्या सेटवर नानांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं होतं, असा आरोप तिनं केला होता. मीटू (MeToo) चळवळी रम्यान तनुश्रीनं लक्ष वेधलं होतं तनुश्री आता बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. तिनं सोशलवर पोस्ट शेअर करत तशी माहिती दिली आहे. तनुश्रीनं यासाठी 15 किलो वजनही घटनही घटवलं आहे.

तनुश्रीनं इंस्टावर भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. यात ती लिहिते की, अनेकांनी मी नोकरी करत असल्याची अफवा पसरवली. मी मनाने कलाकार आहे. माझं करिअर बदलण्याची मी घाई करणार नाही. पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे असं तिनं सांगितलं आहे.

तनुश्री पुढं म्हणते, मी केलेल्या वेब सीरिज आणि सिनेमांमुळं मला इंडस्ट्रीत चांगलं नाव मिळालं आहे. काही लोकांमुळं मी माझं करिअर खराब करणार नाही. बॉलिवूडमध्ये परत येऊन मी काही नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे.

तनुश्रीनं तिच्या नव्या प्रोजेक्टबद्द माहिती देताना लिहिलं की, साऊथ सिने इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या 3 मॅनेजर्सच्या संपर्कात आहे. कास्टिंग करणाऱ्या मुंबईतील 13 ऑफिसेसच्या संपर्कातही मी आहे. इंडस्ट्रीतील काही लोक मला गुपचूप पाठिंबा देत आहेत. मुख्य भूमिकांसाठी काही मोठ्या प्रॉडक्शन हाउससोबत माझी बातचित सुरू आहे असंही तिनं सांगितलं.

तनुश्रीची ही पोस्ट लक्ष वेधून घेत असून, सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. तिची ही पोस्ट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.