Adani Group Entry In Pune | अदानी समुहाची पुण्यातील पिंपरीमध्ये मोठी गुंतवणूक, ‘या’ उद्योगासाठी फिनोलेक्सकडून २५ एकर जमीनीची खरेदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Adani Group Entry In Pune | पुण्यात अदानी समूह डेटा सेंटर स्थापन करत (Data Center In Pimpri) असून त्यासाठी जमीन अधिग्रहण करण्यात आले आहे. कंपनीच्या टेराविस्टा डेव्हलपर्सने फिनोलेक्सकडून हवेली तालुक्यातील पिंपरी औद्योगिक वसाहतीत २५ एकर जमीन खरेदी केली आहे. या जमीनीसाठी अदानी समूहाने सुमारे ४७१ कोटी रुपये मोजले आहेत. या संदर्भातील वृत्त ‘ईटी’ने प्रसिद्ध केले आहे.(Adani Group Entry In Pune)

राज्यात अदानी समूह मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचे दिसत आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये समूहाने अदानी इलेक्ट्रिसिटी औरंगाबाद लिमिटेड कंपनी स्थापन केली होती. त्यानंतर विदर्भात अदानी समूहाने मोठी उलाढाल केली. आता पश्चिम महाराष्ट्रात पुण्यामध्ये कंपनीने सुमारे ४७१ कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आहे.

अदानी समूहाचा हा पुण्यातील जमिन व्यवहाराची नोंदणी प्रक्रिया ३ एप्रिल रोजी पूर्ण झाली. त्यासाठी समूहातील कंपनी टेराविस्टा डेव्हलपर्सने २३.५२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क जमा केले. या प्रक्रियेविषयी फिनोलेक्स समूह आणि अदानी समूहाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

डेटा सेंटरसाठी उभारण्यासाठी अदानी समूहाची मुख्य कंपनी अदानी एंटरप्राईजेसने एजकॉनेक्स सोबत करार
केल्याचे समजते. या व्यवसायात दोन्ही कंपन्यांचा ५०-५० वाटा असेल.
या संयुक्त उपक्रमातंर्गत पुढील दशकात १ गीगावाट क्षमतेचे डेटा सेंटरचे नेटवर्क उभारण्याची योजना आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Lok Sabha Election 2024 | अखेर साताऱ्याचा उमेदवार ठरला, शरद पवारांनी सोशल मीडियावरून ‘हे’ नाव केले जाहीर

Pimpri Police Raid On Spa Center | पिंपरी : स्पा सेंटरवर छापा! वाकडमध्ये सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 3 तरुणींची सुटका (Video)

Baramati Lok Sabha Eelction 2024 | बारामतीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी मैदानात?, पंतप्रधानांच्या सभेसाठी नेत्यांचे प्रयत्न, ‘या’ ठिकाणी होऊ शकते प्रचारसभा