Baramati Lok Sabha Eelction 2024 | बारामतीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी मैदानात?, पंतप्रधानांच्या सभेसाठी नेत्यांचे प्रयत्न, ‘या’ ठिकाणी होऊ शकते प्रचारसभा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बारामती लोकसभेची (Baramati Lok Sabha Eelction 2024) जागा भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. खरंतर मागील दोन वर्षापासूनच भाजपाने मिशन बारामती सुरू केले होते. पण अजित पवारांची (Ajit Pawar) साथ लाभल्याने त्यांच्या माध्यमातून आता शरद पवारांचा (Sharad Pawar) बालेकिल्ला हिसकावून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बारामती मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सभा घेण्यासाठी भाजपा नेते (BJP Leader) प्रयत्नशील आहेत.(Baramati Lok Sabha Eelction 2024)

ही सभा खडकवासला विधानसभा मतदारसंघात (khadakwasla Vidhan Sabha) घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. येत्या एप्रिलअखेर किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात ही सभा होईल, असा दावाही करण्यात येत आहे.

पंतप्रधान मोदींची सभा महायुतीच्या बारामतीसह मावळ (Maval Lok Sabha), शिरूर (Shirur Lok Sabha) आणि पुणे (Pune Lok Sabha) अशा महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी असेल, असे म्हटले जात आहे. मात्र, सभेचे नियोजन खडकवासला विधानसभा मतदारसंघात करण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे.

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा अजित पवार असा सामना आहे.
शरद पवार यांचा हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यासाठीच पंतप्रधान मोदींची सभा घेण्याचे नेत्यांचे प्रयत्न आहेत.

भाजपा नेते, मंत्री तसेच पुणे, बारामती, शिरूर मतदारसंघ क्लस्टर प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी मोदींच्या सभांबाबत
म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदर्भात सध्या दोन सभा होणार आहेत.
जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठीही सभा घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
सभा होणार की नाही, हे अद्यापही निश्चित झालेले नाही. मात्र, सभेसाठी प्रयत्नशील आहोत.

तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी म्हटले की, पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या
चारही उमेदवारांसाठी सभा आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
खडकवासला मतदारसंघात सभा व्हावी, अशी आमची इच्छा आहे.
प्रशस्त मैदान आणि वाहनतळाची सुविधा असलेल्या ठिकाणी सभा आयोजित केली जाईल, असे गारटकर यांनी म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Fruits for Blood Circulation | शरीरात भरपूर रक्त भरतील ‘ही’ 5 फ्रूट्स, रक्ताभिसरण सुद्धा होईल वेगाने, प्लेटलेट्स काउंट वाढेल जलद

Pune Nana Peth Crime | पुणे : मारहाण करुन अंगावरील कपडे फाडून असभ्य वर्तन, चार जणांवर गुन्हा

Pune Lok Sabha Election 2024 | पुण्यातील भाजपा उमेदवार मोहोळ यांचा पूर्व प्रमाणीरकण न करता सोशल मीडियावर प्रचार, जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस