Satara Lok Sabha Election 2024 | अखेर साताऱ्याचा उमेदवार ठरला, शरद पवारांनी सोशल मीडियावरून ‘हे’ नाव केले जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Satara Lok Sabha Election 2024 | सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मोठा गोंधळ सुरू होता. परंतु, आता या जागेचा तिढा सुटला असून राष्ट्रवादी काँग्रेसने येथील उमेदवाराचे नाव ‘एक्स’वरून जाहीर केले आहे. साताऱ्यातून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून (Sharad Pawar NCP) शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) निवडणूक लढणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रावेरमधून (Raver Lok Sabha) श्रीराम पाटील (Shriram Patil) यांची देखील उमेदवारी आज जाहीर केली आहे.(Satara Lok Sabha Election 2024)

श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी नकार दिल्यानंतर सातारा येथून पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे नावे देखील चर्चेत आले होते. मात्र, चव्हाण यांचे नाव मागे पडले होते. आता हा तिढा सुटला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलेले श्रीराम पाटील हे एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांच्याविरूद्ध लढणार आहेत.

दरम्यान, महायुतीचा साताऱ्यातील उमेदवार अधिकृतपणे जाहीर झालेला नाही.
येथून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
जर उदयनराजेंना येथून उमेदवारी मिळाली तर उदयनराजे विरूद्ध शशिकांत शिंदे असा सामना रंगणार आहे.
आज भाजपची नववी यादी जाहीर होणार असून त्यामध्ये साताऱ्याचा उमदेवार जाहीर होऊ शकतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Fruits for Blood Circulation | शरीरात भरपूर रक्त भरतील ‘ही’ 5 फ्रूट्स, रक्ताभिसरण सुद्धा होईल वेगाने, प्लेटलेट्स काउंट वाढेल जलद

Pune Nana Peth Crime | पुणे : मारहाण करुन अंगावरील कपडे फाडून असभ्य वर्तन, चार जणांवर गुन्हा

Pune Lok Sabha Election 2024 | पुण्यातील भाजपा उमेदवार मोहोळ यांचा पूर्व प्रमाणीरकण न करता सोशल मीडियावर प्रचार, जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस