Adar Poonawala | अदर पुनावाला यांची मोठी घोषणा ! ‘Covovax ऑक्टोबरमध्ये तर लहान मुलांसाठीची लस 2022 मध्ये’

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) प्रमुख अदर पुनावाला (Adar Poonawala) यांनी मोठी घोषणा केली आहे. कोवोवॅक्स (Covovax) या लसीबद्दल माहिती देताना त्यांनी ही लस भारतात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाँच होणार असल्याचे अदर पूनावाला (Adar Poonawala) यांनी म्हटलंय. तसेच सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल आभार देखील मानले आहेत. पूनावाला यांनी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची संसदेत भेट घेतली. त्या दोघांमध्ये 30 मिनिटे बैठक झाली.

अदर पूनावाला यांनी म्हटले की, सरकार आम्हाला पाठिंबा देतंय. कसल्याही प्रकारची आर्थिक अडचण नाही. मी पाठिंब्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) आभार मानतो. मोठ्यांसाठी कोवोवॅक्स ही लस ऑक्टोबरपर्यंत येईल, अशी मला आशा आहे. आम्ही नेहमीच लस उत्पादक क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात राहिलो आहोत. ते पुढे म्हणाले, कोवोवॅक्स ही दोन डोसची लस आहे. जेव्हा कोवोवॅक्स लाँच होईल तेव्हाच त्याची किंमत देखील लोकांना समजले. लहान मुलांसाठीची लस मार्च 2022 पर्यंत उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

 

कोवोवॅक्सची निर्मिती भारतात

अनेक विकसनशील देशात लसीकरणासाठी Novavax महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे अमेरिकेतील तज्ज्ञांनी सांगितले आहे.
भारतात लसीकरण निर्मिती करणारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया Novavax या लसीची निर्मिती करत आहे.
भारतात निर्मिती केली जात असल्याने या लसीला Covovax असं म्हटलं जातं.

वाहतुक करणं सोपं

Novavax चे मुख्य कार्यअध्यक्ष स्टेनली एर्क (Stanley Erk) यांनी सांगितले की, या दोन शॉटच्या लसीला 2 ते 8 डीग्री सेल्सियसच्या दरम्यान ठेवण्याची गरज असते.
त्यामुळे लसीला स्टोअर करणे तसेच त्याची वाहतुक करणं सोपं होणार आहे.
खासकरून विकसनशील देशांमध्ये लसीचा पुरवठा वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भुमिका निभावण्याची आशा आहे.
सुरुवातीला आम्ही लसीचे डोस गरीव व अति गरीब देशांमध्ये पाठवणार आहोत.

 

Web Title : adar poonawala | covovax will launch in india by october for adults sii ceo adar poonawalla

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरुच, सोन्याचा दर 47 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या आजचा दर

Raj Kundra Pornography Case | एका अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली – ‘गुप्तांग दाखवण्यात येणार नाही असं सांगून…’

Pune Crime | युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या GST टोळी प्रमुखासह तिघांना अटक