Adipurush | आदिपुरुष चित्रपटात जानकी पात्रासाठी क्रिती सेनॉन ऐवजी निर्मात्यांनी केली होती ‘या’ अभिनेत्रीची निवड

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या सर्वत्र एकाच चित्रपटाची चर्चा आहे आणि तो म्हणजे दिग्दर्शक ओम राऊत यांचा आदिपुरुष चित्रपट. (Adipurush) टीझर पासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आदिपुरुषने प्रमोशन तर जोरदार केले मात्र प्रदर्शनाच्या दिवशीच चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली. रामायणावर (Ramayan) आधारित या चित्रपटातील डायलॉग, VFX, ग्राफिक्स आणि कास्टिंगवरुनही या सिनेमाला ट्रोल केले जात आहे. या चित्रपटात श्रीरामाची भूमिका अभिनेता प्रभास (Actor Prabhas), सितेची भूमिका अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) तर रावणाची भूमिका सैफ अली खानने (Saif Ali Khan) साकारली आहे. आदिपुरुषमध्ये (Adipurush) मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. चित्रपटात हनुमानाची भूमिका अभिनेता देवदत्त नागे (Actor Devdatta Nage), शूर्पणखा ही भूमिका तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि कैकयीची भूमिका सोनाली खरे (Sonali Khare) यांनी साकारली आहे. मात्र सीतेच्या भूमिकेसाठी क्रिती सनॉनआधी वेगळ्या अभिनेंत्रीचा विचार करण्यात आला होता.

आदिपुरुषमध्ये जानकी हे पात्र साकारणारी अभिनेत्री क्रितीच्या भूमिकेबाबत अनेकांनी मते नोंदवली आहेत. सितेच्या भुमिकेत ती शोभत नसल्याचे मत अनेकांनी मांडले आहे तर काहींनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. मात्र जानकी पात्रासाठी क्रिती हि पहिली निवड नव्हती. क्रिती आधी दोन दाक्षिणात्य अभिनेत्रींना या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते.

एका मीडिया रिपोर्टनुसार, आदिपुरुष चित्रपटातील जानकी या पात्रासाठी निर्मात्यांची पहिली निवड ही दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश (Keerthy Suresh) ही होती.
आधी किर्तीनेही चित्रपटासाठी होकार दिला होता.
परंतु, सुपरस्टार रजनीकांत (Superstar Rajinikanth) यांच्याबरोबरच्या चित्रपटामुळे तिने ‘आदिपुरुष’ला
नकार कळवला. किर्ती नंतर बाहुबली फेम अनुष्का शेट्टीला (Anushka Shetty) जानकीच्या भूमिकेसाठी
विचारण्यात आलं होतं. मात्र तिने ही भूमिका साकारण्यास नकार दिला.
या भूमिकेसाठी बॉलीवुडमधील (Bollywood) दोन अभिनेत्रींचा विचार करण्यात आला होता.
यामध्ये अनुष्का शर्मा (Anushka Sharma) व कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या नावाची चर्चा होती.
अखेर हा प्रोजेक्ट क्रिती सेनॉन कडे आला. आणि तिने चित्रपटात सीतेची भूमिका साकारली. (Adipurush Review)

Web Title :  Adipurush Movie | kriti sanon was not first choice for janaki kreethy suresh anushka shetty declined

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Actress Asha Parekh | सुप्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना अडकल्यामुळे 16 तास प्यायला पाणी सुद्धा मिळाले नाही ; वाचण्याची नव्हती शक्यता

Actress Ameesha Patel | वॉरंट जारी होताच अभिनेत्री अमिषा पटेलची तोंड झाकून न्यायालयात हजेरी; ‘हे’ आहे प्रकरण

Pune PMC – Katraj Dog Park | नियोजित डॉग पार्कमुळे राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या विस्तारीकरणाला अडथळा?