Actress Ameesha Patel | वॉरंट जारी होताच अभिनेत्री अमिषा पटेलची तोंड झाकून न्यायालयात हजेरी; ‘हे’ आहे प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल (Actress Ameesha Patel) हिला आज तोंड झाकून कोर्टात येण्याची वेळ पडली. तिच्या एका जुन्या प्रकरणामुळे अभिनेत्री अमिषाच्या अडचणीत वाढ झाली असून यामुळे तिला कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आली आहे. ती रांचीच्या दिवाणी न्यायालयात (Civil Court Ranchi) हजर झाली होती. अमिषाच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यामुळे ती आज (दि.१७) न्यायालयात हजर राहिली होती. आता 10 हजार रुपयांच्या बॉण्डवर तिचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. आणि पुन्हा 21 तारखेला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. ती 21 ला आली नाही तर जामीन रद्द होऊ शकतो. (Actress Ameesha Patel)

आमिषाला न्यायालयात आणणारे हे प्रकरण 2008 सालातील असून तिच्यावर अडीच कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप (Ameesha Patel Fraud Allegation) करण्यात आला आहे. रांचीमधील निर्माता अजय कुमारने (Producer Ajay Kumar) हा आरोप अमिषावर केला असून त्याने चेक बाऊन्स, फसवणूक आणि धमकावल्याचा आरोप अभिनेत्रीवर केला आहे. अमिषा पटेल सोबत तिचा बिझनेस पार्टनर कुणाल याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमिषावर आरोप करणारा व्यक्ती हा निर्माता असून अमिषाने त्याच्याकडून ‘देसी मॅजिक’ (Desi Magic) हा चित्रपट बनवण्याच्या नावाखाली अडीच कोटी रुपये घेतल्याचा दावा त्याने केला होता.
चित्रपटाच्या निर्मितीनंतर ती त्याला व्याजासकट परत करणार होती.
2013 मध्ये या चित्रपटाचे शूटिंग चालू करण्यात आले होते.
पण आजपर्यंत तो पूर्ण झाला नसून हा चित्रपट पडद्यावर येऊ शकला नाही. तो चित्रपट प्रदर्शित झालाच नाही.
यामुळे निर्माता अजयने अमिषाकडून त्याचे पैसे मागितले, मात्र यासाठी अमिषाने नकार दिला व पैसे दिलेले नाहीत.
नंतर अमिषाने अजयला दोन चेक दिले. त्यापैकी एक चेक हा 2.5 कोटी तर दुसरा 50 हजारांचा होता.
मात्र अमिषाने दिलेले हे दोन्ही चेक बाऊंस झाले.
यामुळे अजयने आपली फसवणूक झाली असून अभिनेत्री अमिषा पटेलने आपल्याला कोट्यावधी रुपयांना गडवले असल्याची तक्रार दाखल केली.
अमिषावर अनेकदा समन्स (Summons To Ameesha Patel) बजावण्यात आले. पण ती कोर्टात गैरहजर राहिली. यामुळे तिला वॉरंट जारी करण्यात आले. वॉरंटमुळे आज अभिनेत्री अमिषा पटेल चेहरा झाकून न्यायालयात हजर झाली होती. अजयने न्यायालयात धाव घेतल्यामुळे अमिषा अडचणीमध्ये सापडली आहे. (Ameesha Patel Warrant)

अमिषा पटेलला (Actress Ameesha Patel) सध्या जामीन मिळाला असून 10 हजार रुपयांच्या बॉण्डवर तिचा
जामीन मंजूर करण्यात आला आहे. तिला येत्या 21 तारखेला पुन्हा न्यायालयाने हजर रहायला लावले असून ती
परत हजर न राहिल्यास तिचा जामीन नामंजूर करण्यात येऊ शकतो.

Web Title :  Actress Ameesha Patel | amisha patel reached the court hiding her face 5 years old case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणाऱ्या 3 गुन्हेगारांना हिंजवडी पोलिसांकडून अटक, 3 पिस्टल व 1 काडतुस जप्त

Congress Leader Mohan Joshi | राजेंद्रनगर येथील पूरग्रस्तांच्या प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी – मोहन जोशी

Devendra Fadnavis | जाहिरातीवरील शरद पवारांच्या खोचक टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘अशा गोष्टींना…’

Pune Crime News | पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा युवकावर गोळीबार, प्रचंड खळबळ