Actress Asha Parekh | सुप्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना अडकल्यामुळे 16 तास प्यायला पाणी सुद्धा मिळाले नाही ; वाचण्याची नव्हती शक्यता

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख (Actress Asha Parekh) या एक जेष्ठ कलाकार आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर आशा यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत. अनेक पिढ्यांचे त्यांनी मनोरंजन केले. अशा सर्वांच्या लाडक्या कलाकार आशा पारेख या एकदा अशा बिकट प्रसंगात अडकल्या होत्या की त्यामधून त्यांची जीवंत सुटका होण्याची शक्यता फार कमी होती. मुंबईमध्ये त्यांच्यावर हा प्रसंग बेतला होता. अभिनेत्री आशा पारेख (Actress Asha Parekh) या तब्बल 18 तास गाडीमध्ये अडकल्या होत्या.

अभिनेत्री आशा पारेख यांच्या चित्रपटाबद्दल अनेकांना आजही माहित आहे तरी त्यांच्यावरील या प्रसंगाबद्दल फार कमी लोकांना माहित असेल. 18 वर्षांपूर्वी मुंबईला (Mumbai) महापूराने झोडपून काढले होते. त्यावेळी रस्त्यांवर कमरे एवढे पाणी साचले होते. यावेळी अभिनेत्री आशा पारेख या 15 ते 16 तास कारमध्ये अडकल्या होत्या. यावेळी परिस्थिती इतकी बिघडली होती, की त्या वाचतील का अशी शंका निर्माण झाली होती.

अभिनेत्री आशा पारेख कामाच्या निमित्ताने बाहेर पडल्या होत्या. त्या आणि त्यांचे मित्र आणि अभिनेते शम्मी कपूर (Actor Shammi Kapoor) कामासाठी एकत्र साउथ मुंबईमध्ये आले होते. दुसऱ्या दिवशी परत येताना मुसळधार पाऊस सुरू झाला. ते दिवस पावसाचेच होते मात्र पावसाने अचानक रौद्र रुप धारण केले. मुंबईमध्ये एवढा जबर पाऊस झाला की मुंबईमध्ये महापूर आला. या पूरात आशा पारेख अडकून राहिल्या. (Mumbai Monsoon)

2005 साली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आशा पारेख यांनी हा भयंकर प्रसंग सांगितला. त्यांनी सांगितले की, त्या कारमध्ये एकाच ठिकाणी 15 तास अडकल्या होत्या. त्यांना खाण्यासाठी काही नव्हते किंवा पिण्यासाठी पाण्याचा साधा एक थेंबही 15 तास नव्हता.

पुढे त्यांनी सांगितले की, संपूर्ण रात्रभर त्यांची कार ट्रॅफिकमध्ये अडकली होती. रस्त्यांवर कमरेपर्यंत पाणी भरलं होतं.
त्यामुळे त्यांना बाहेरदेखील पडता येत नव्हतं. एक वेळ अशी आली, की आशा यांना त्या कारमधून जिवंत बाहेर पडतील असं वाटत नव्हतं. त्यावेळी त्यांचे अनेक जवळचे लोक, नातेवाईक अतिशय चिंतेत होते असंही त्यांनी सांगितले.

अभिनेत्री आशा पारेख मनोरंजनविश्वात अनेक वर्षे काम केलं असून त्याचे चित्रपट हिट ठरले आहेत.
त्यांची ‘दिल देके देखो’ (Dil Deke Dekho), ‘जब प्यार किसीसे होता है’ (Jab Pyaar Kisise Hota Hai),
‘तीसरी मंझील’(Teesri Manzil) अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
आशा पारेख आणि अभिनेता राजेश खन्ना (Actor Rajesh Khanna) यांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती.

मात्र अभिनेत्री आशा पारेख (Actress Asha Parekh) यांनी आता मोठ्या पडद्यापासून सुट्टी घेतली आहे.
सध्या त्या डान्स अकॅडमी मध्ये नृत्य शिकवतात. तसेच त्यांचे मुंबईतील सांताक्रूजमध्ये एक रुग्णालयदेखील आहे.
त्यांनी 1999 पासून सिनेविश्वातून रिटायरमेंट घेतली आहे.

Web Title :  Actress Asha Parekh | actress asha parekh was stuck in car for 16 hours in mumbai rains floods

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणाऱ्या 3 गुन्हेगारांना हिंजवडी पोलिसांकडून अटक, 3 पिस्टल व 1 काडतुस जप्त

Congress Leader Mohan Joshi | राजेंद्रनगर येथील पूरग्रस्तांच्या प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी – मोहन जोशी

Devendra Fadnavis | जाहिरातीवरील शरद पवारांच्या खोचक टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘अशा गोष्टींना…’

Pune Crime News | पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा युवकावर गोळीबार, प्रचंड खळबळ