Aditya Roy Kapoor | आदित्य रॉय कपूरचा याआधी 5 वेळा झाला आहे प्रेमभंग

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या बॉलीवुडमध्ये अनेक नवनवीन कपल आपली लव्ह लाईफ (Love Life) एन्जॉय करताना दिसत आहे. यामध्येच सध्या चर्चेत आलेले नवीन कपल म्हणजे अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) व अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हे लवली कपल त्यांचे रिलेशन एन्जॉय कराताना दिसत आहेत. आदित्य व अनन्याचे (Aditya Roy Kapoor And Ananya Panday) स्पेन मधील रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये त्यांची जोडी चांगली दिसत असून ते कॉन्सर्टला देखील एकत्र गेले होते. मात्र काही नेटकऱ्यांनी ही जोडी आवडली नसून आदित्य व अनन्याला ट्रोल केले जात आहे.

 

 

 

अभिनेत्री अनन्या पांडे ही आता इंडस्ट्रीमध्ये नवीन आहे व लहान देखील आहे. मात्र आदित्य रॉय कपूर हा 37 वर्षांचा असून अनन्या पेक्षा वयाने खूप मोठा आहे. सोशल मीडियावर ट्रोलर्स आदित्यला 13 वर्षांनी लहान असलेल्या अनन्याला (Aditya And Ananya Dating) डेट करत असल्यामुळे ट्रोल करत आहेत. कोणी तरी तुझ्या वयाची शोध असा खोचक सल्ला देखील देत आहेत. (Aditya And Ananya Affair) मात्र आदित्यचे हे काही पहिले प्रेम नाही. या आधी आदित्य रॉय कपूरने 5 वेळा वेगवेगळ्या अभिनेत्रींवर आपले नाते जोडले आहे. मात्र त्याचे हे कोणतेही नाते टिकलेले नाही. या आधी आदित्यने तब्बल 5 वेळा प्रेम केले मात्र त्याचे हे कोणतेच प्रेम त्याच्यासोबत राहिले नाही. (Aditya Roy Kapoor Affair) आता आदित्य अभिनेत्री अनन्या पांडेच्या प्रेमामध्ये असून त्यांचे प्रेमाने मिठी मारलेले फोटो देखील (Aditya And Ananya Viral Photo) खूप व्हायरल होत आहेत.

 

अभिनेता आदित्य रॉय कपूरने 2013 साली ‘आशिकी ‘2 (Aashiqui 2)
चित्रपटामधून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. यामध्ये आदित्यने अभिनेत्री श्रद्धा कपूर
(Shraddha Kapoor) सोबत स्क्रीन शेअर केली होता. सुरुवातीच्या काळात अभिनेता आदित्य रॉय कपूर लाईमलाईटमध्ये होता. आशिकी 2 चित्रपटादरम्यान तो व श्रद्धा एकमेंकांना डेट करत होते. आदित्य व श्रद्धा (Aditya and Shraddha Kapoor Affair) अनेकदा इव्हेंट व रेस्टॉरंट मध्ये एकत्र दिसून येत होते. मात्र त्यांचे हे नाते पुढे राहिले नाही आणि आदित्य व श्रद्धाचे रस्ते वेगळे झाले. मात्र ही जोडी खूप गाजली होती व दोघांच्या चाहत्यांना खूप आवडत देखील होती.

 

काही रिपोर्टनुसार अभिनेता आदित्य रॉय कपूरने सुरुवातच्या काळात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) देखील डेट केले आहे. मात्र रिया व आदित्य कधीही एकत्र दिसून आले नाहीत. व त्यांचे हे नाते जास्त काळ टिकले नाही. (Rhea Chakraborty Boyfriend) अभिनेता आदित्य रॉय कपूरचे नाव अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सोबत देखील जोडण्यात आले होते. कतरिना व आदित्य (Katrina and Aditya) कामा व्यतिरिक्त अनेकदा सोबत दिसून येत होते मात्र आदित्यचे हेही प्रेम जास्त काळ टिकले नाही व आदित्याचे हृदय पुन्हा एकदा तुटले.

 

 

एवढेच नाही तर अभिनेता आदित्य रॉय कपूरने हेमा मालिनी (Hema Malini)
यांची मुलगी अहाना देओल (Ahana Deol) हिला देखील डेट केले आहे.
याआधी अहाना व रणवीर सिंग (Ahana Deol And Ranveer Singh)
एकमेकांना डेट करत होते. मात्र आदित्यमुळे त्यांचे नाते तुटले. अभिनेता रणवीर
‘कॉफी विथ करण’ (Coffee with Karan) या शोमध्ये अहानाचे नाव न घेता सांगितले की, मी त्या मुली साठी अक्षरशः वेडा होतो. मात्र अभिनेता आदित्य रॉय कपूरमुळे (ARK) आमचे 4 वर्षांचे नाते संपले होते.

 

 

 

 

बॉलीवुडमधील आकर्षक अभिनेत्यांमध्ये अभिनेता आदित्य रॉय कपूरचे
(Aditya Roy Kapoor) नाव घेतले जाते. अनेक तरुणी आदित्य रॉय कपूरच्या चाहत्या आहेत.
यामध्ये काही अभिनेत्रींचा देखील समावेश आहे. आदित्याने अनेक सिनेमे केले असले तरी तो
अजून बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकलेला नाही. त्याने 2013 साली ‘आशिकी 2’ (Aashiqui 2)
मधून पदार्पण केले. त्यानंतर तो ‘ये जवानी है दिवानी’ (Yeh Jawaani Hai Deewani), ‘ओके जानू’
(OK Jaanu), ‘मलंग’ (Malang) व ‘गुमराह’ (Gumrah) या चित्रपटामध्ये झळकला आहे. पण त्याचा कोणताही सिनेमा ब्लॉकबस्टर ठरलेला नाही. ‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध चॅट शो मध्ये अनन्या पांडेंने (Ananya Pandey Boyfriend) आदित्यवर क्रश असल्याचे कबूल केले होते. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. आता आदित्य व अनन्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

 

 

Web Title : Aditya Roy Kapoor | aditya roy kapur love affairs now name joining with 13years younger ananya panday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा