Akshay Kumar | अक्षयच्या OMG 2 वर सेन्सॉर बोर्डचा दणका; चित्रपटावर घालणार बंदी?

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या बॉलीवुडमधील एका चित्रपटाची खूप चर्चा आहे तो म्हणजे अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आगामी चित्रपट ओएमजी 2. (OMG 2) या चित्रपटाचा टीझर दोन दिवसांपूर्वी रिलिज करण्यात आला. प्रेक्षकांना हा टीझर (OMG 2 Teaser Out) आवडला असला तरी काहींनी या चित्रपटावर व सीन्सवर आक्षेप घेतला आहे. तसेच हा ओएमजी 2 सिनेमा येत्या 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस  (OMG 2 Release Date) येणार होता. मात्र या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने होल्डिंगवर ठेवले आहे. आपल्या य़ेथे कोणताही सिनेमा भारतात प्रदर्शित होण्यापूर्वी त्याला सेन्सॉर बोर्डेचे सर्टिफिकेट (Censor Board Certificate) घेणे आवश्यक आहे. मात्र आता सेन्सॉर बोर्ड ओएमजी 2 चित्रपटावर (Akshay Kumar) बंदी आणणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.( OMG 2 Censor Board Certificate) पण एका रिपोर्टनुसार सेन्सॉर बोर्ड चित्रपटावर बंदी (Censor Board Bans OMG 2) आणू शकत नाही. तर ओमजी 2 चित्रपटाबाबत बोर्ड काही प्रक्रिया राबवू शकते.

 

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ अर्थात (CBFC) ने ओएमजी 2 चित्रपटाचे पहिले स्क्रिनिंग पाहिले आहे. 12 जुलैला ‘एक्जामिनिंग कमिटी’‌ने हा चित्रपट पाहिला. पण त्यानंतर ओएमजी 2 चित्रपटाला ‘रिव्ह्यू कमिटी’कडे शिफारस करण्यास आली. (OMG 2 Review Committee) बोर्डच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती सांगितली आहे. त्या अधिकाऱ्यांनी सांगितले की बोर्डकडे कोणत्याही सिनेमावर बंदी घालण्याचे अधिकार नसतात. अनेक गंभीर बाबींवर लक्ष देत बोर्ड फक्त सर्टिफिकेट नाकारू शकते. किंवा चित्रपट निर्मात्यांना चित्रपटामध्ये बदल करण्यास बोर्ड सांगू शकते. किंवा चित्रपटाला पुन्हा एकदा रिव्ह्यु टीमकडे पाठविले जाते.

 

 

सार्वजनिक चित्रपटाच्या प्रदर्शनावर नियंत्रण ठेवणारी भारतातील हे केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (Central Board Of Film Certification) हे चित्रपटांचे समीक्षण करुन त्यांना सर्टिफिकेट देते. समाजात तेढ वाढणार नाही, चित्रपटातून कोणाच्या भावना दुखावणार नाहीत व चूकीचा संदेश समजात पसरणार नाही अशा पद्धतीची काळजी घेत बोर्ड सर्टिफिकेट देत असते. हे सर्टिफिकेट देण्यासाठी सेन्सॉर बोर्डकडे जेव्हा चित्रपट येतो तेव्हा रिजिनल अधिकारीसह 7 सेन्सॉर सदस्य हा चित्रपट पाहतात. या सदस्यामध्ये 4 महिला तर 3 पुरुष व्यक्ती असतात. ही कमिटी पहिल्यांदा चित्रपट पाहते. या कमिटीस ‘एक्जामिंनिंग कमिटी’ असे देखील म्हणतात.

 

त्यानंतर ‘रिव्ह्यु टीम’कडे सिनेमा पाहण्यासाठी दिला जातो. ‘रिव्ह्यु टीम’ म्हणजे दुसऱ्यांदा सिनेमा पाहणारी टीम असते. यानंतर जर काही चित्रपटामध्ये वादग्रस्त असेल किंवा जे बोर्ड न पटणारे काही असेल तर पुन्हा चित्रपट रिव्ह्यु टीमकडे पाहण्यासाठी पाठवला जातो. मात्र यावेळी कमिटी पूर्णपणे नवीन असते. रिव्ह्यु टीममधील सदस्यांची निवड अध्यक्ष करतात. सर्व नवीन सदस्य पुन्हा एकदा सिनेमा पाहतात. यामध्ये पहिल्या एक्जामिंनिंग कमिटीमधील देखील सदस्य नसतो. जर सेंसर बोर्ड च्या अध्यक्षांनी शिफारस केली तर एका सदस्याला घेता येते.

 

 

सेन्सॉर बोर्डच्या रिव्ह्यु टीमने दर दुसऱ्यांदा सिनेमा पाहिला तरी त्यामध्ये दोष आढळत असतील तर पुढे स्वतः सेन्सॉर मंडळाचे अध्यक्ष (Censor Board Chairman) स्वतः चित्रपट पाहतात. त्यामुळे रिव्ह्यु टीम नाही म्हणत असली तरी चित्रपट निर्मात्यांकडे अध्यक्षांनी सिनेमा पाहण्याची संधी असते. मात्र या संधीनंतर ही सिनेमा पास होत नसेल तर निर्मात्यांना कोर्टामध्ये जाण्यावाचून पर्याय उरत नाही. सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्यास निर्मात्यांना कोर्टात जाण्याचा अधिकार असतो.

 

 

 

अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) OMG 2 चित्रपट रिव्ह्यू कमिटीकडे पाठवण्यात आला आहे.
यावर ओएमजी 2 चित्रपटाची निर्माता कंपनी व्हायाकॉम इंडियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
चित्रपट निर्मात्यांमार्फेत स्पष्टीकरण देण्यास नकार देण्यात आला आहे.
आता ओएमजी 2 ठरल्याप्रमाणे 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार (Ban OMG 2) का नाही
आणि चित्रपटाला सेन्सॉर बोर्ड सर्टिफिकेट देणारा का नाही याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title :  Akshay Kumar | censor board has no rights to ban any film here is what cbfc
can do with akshay kumar starrer omg 2 know details here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा