Aditya Roy Kapoor And Ananya Pandey | आदित्य रॉय कपूरने रोमॅंटिक रिलेशनबाबत मांडले मत

पोलीसनामा ऑनलाइन – बी – टाऊन मधील चर्चेत असणारे कपल आदित्य रॉय कपूर व अनन्या पांडे (Aditya Roy Kapoor And Ananya Pandey) यांच्या रिलेशनबाबत रोज नवी अपडेट येत आहे. त्यांचे स्पेन मधील रोमॅंटिक फोटो (Aditya And Ananya Romantic Photo) देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. अनेक दिवसांपासून त्यांचे अफेअर चालू असल्याच्या अफवा समोर येत होत्या. मात्र फोटो व्हायरल झाल्यानंतर या अफवा खऱ्या ठरल्या आहेत. आता अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor And Ananya Pandey) याने एका इव्हेंटमध्ये त्याच्या प्रेमाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने रिलेशनशिपमध्ये गरजेच्या असणाऱ्या काइंडनेस वर भाष्य केले आहे.

अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) हा बॉलिवूडमधील हॅन्डसम अभिनेत्यांमध्ये गणला जातो. त्याचे या आधी अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशन राहिले आहे. मात्र प्रत्येकवेळी त्याचा प्रेमभंग झाला आहे. आता तो अनन्या पांडेच्या (Ananya Pandey Affair) प्रेमात आहे. एका इव्हेंटमध्ये त्याने प्रेमामध्ये एकमेंकांबद्दल असणार दयाळूपणा किती महत्त्वाचा व गरजेचा आहे. डेटिंग लाईफमध्ये एकमेंकावर विश्वास दाखवणे व दयाळूपणा दाखवणे खूप गरजेचे असल्याचे मत अभिनेता आदित्य रॉय कपूर याने मांडले आहे.

आदित्यने सांगितले की, “रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीसाठी व त्या व्यक्तीसाठी आपण चांगले वागणे फार गरजेचे असते. तसेच इतरांच्या बाबतीत दयाळूभाव असणे हे कधीच कमी नाही झाले पाहिजे. या काइंडनेस मुळे आपण समाजामध्ये राहत असतो. वावरत असतो. प्रत्येकामध्ये दयाळूपणा असतोच यामुळे आपण लोकांसोबत राहू शकतो. नाते कोणतेही असो, प्रेमाचे वा मैत्रीचे आपण दयाळूभाव दाखवणे फार गरजेचे असते. खास करुन रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये.”

अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या या विचारांवर काही नेटकरी कौतुक करत आहेत. आदित्य व अनन्या (Aditya Roy Kapoor And Ananya Pandey) यांना शुभेच्छा देत आहेत. तर काही नेटकरी त्यांना ट्रोल करत आहे. अनन्या व आदित्यमध्ये (Aditya And Ananya Relationship) वयाचे अंतर खूप असल्याने त्यांना ट्रोलर्स निशाण्यावर घेत आहेत. आदित्य रॉय कपूर हा ‘द नाईट मॅनेजर 2’ (The Night Manager 2) या वेबसीरिजमध्ये झळकला होता. लवकरच तो ‘मेट्रो इन दिनों’ (Metro In Dino) मध्ये भूमिका साकारणार असून यामध्ये त्याच्यासोबत सारा अली खान (Sara Ali Khan) असणार आहे.

Web Title :   Aditya Roy Kapoor And Ananya Pandey | aditya roy kapur talks about kindness in love amid dating rumors with ananya panday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा