India Rain Update | उत्तर भारताला पुराचा मोठा फटका; अनेक भाग पाण्याखाली, आज पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

नवी दिल्ली : India Rain Update | उत्तर भारतात (North India) जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. तेथील लोकांची परिस्थिती चिंताजनक (India Rain Update) झाली आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) परिस्थिती गंभीर आहे. दिल्लीला (Delhi) मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. सध्या तिथे पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे यमुना नदीच्या (Yamuna River) पाणी पातळीत हळूहळू घट होत आहे. दिल्लीत रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. अनेक नागरिकांना सुरक्षीतस्थळी हलवण्यात आले आहे.

उत्तर भारतात (North India) आजही पावसाची (India Rain Update) शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंजाब आणि हरियाणात (Punjab And Haryana) पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) शनिवारी उत्तर प्रदेश राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) तर 50 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे उत्तर प्रदेशातील नद्यांच्या पाण्याची पातळीही वाढू लागली आहे.

दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे (Rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पुरामुळे (Flood) अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे.
देशातील 18 राज्यांतील 188 जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून मोठे नुकसान झाले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांनी शुक्रवारी पूरग्रस्त हिमाचल प्रदेशसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधील 180.40 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम जारी केली आहे.
त्यामुळे राज्य सरकारला पावसाळ्यात बाधित लोकांसाठी मदत आणि उपाययोजना करण्यात मदत होणार असल्याचे शहा म्हणाले.

उत्तराखंडमध्ये सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी

उत्तराखंडमधील सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी (School Holidays) जाहीर करण्यात आली आहे.
17 जुलैला हरेला सणाची सुट्टी असून 16 जुलैला रविवार असल्याने शाळा बंद राहणार आहेत.
अशाप्रकारे राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सलग चार दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Web Title :  India Rain Update | rain update india orange alert for rain in north india today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा