Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावर दुर्घटना; गर्डर कोसळल्याने पाच अभियंत्यांसह १७ जणांचा मृत्यु, ३ जखमी

कासारा : Samruddhi Mahamarg Accident | एका बाजूला सुरु झालेल्या समृद्धी महामार्गावर भरधाव जाणार्‍या वाहनांचे दररोज अपघात होत असतानाच आता काम सुरु असलेल्या समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना (Samruddhi Mahamarg Accident) घडली आहे. गर्डर बसवत असताना लाँचरसह गर्डर कोसळल्याने त्या खाली दबून पाच अभियंत्यांसह १७ कामगारांचा मृत्यु (Death) झाला. तिघे जण जखमी झाले आहेत.

ही दुर्घटना शहापूर तालुक्यातील मुंबई -नाशिक महामार्गावर (Mumbai-Nashik Highway) ५ ते ६ किमी ग्रामीण भागात असलेल्या सरलांबे गावाच्या हद्दीत सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. (Samruddhi Mahamarg Accident)

शहापूर तालुक्यात मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे.
सरलांबे गावाजवळ रात्री पुलावरील गर्डर बसविण्याचे काम सुरु होते.
२६ कामगार, ९ अभियंत्यांच्या मदतीने हे काम सुरु असताना हा गर्डर अचानक कामगार व इंजिनिअरांच्या अंगावर कोसळला.
या सिमेंटच्या या गर्डरखाली कामगार व त्यावर क्रेन व लोखंडी सज्जा पडलेला होता. अंधार आणि ग्रामीण भाग असल्याने मदत पोहचण्यास वेळ लागला. पहाटे साडेचार वाजता महाकाय क्रेन मागविण्यात आली. तिच्या सहाय्याने कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरु होते. २६ कामगारांपैकी १७ कामगारांचा मृत्यु झाला असून त्यांचे पार्थिव शहापूर तालुका रुग्णालयात नेण्यात आले आहे. तीन कामगारांवर उपचार करण्यात येत आहेत. १७ मृतामध्ये पाच अभियंत्यांचा समावेश आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Benefits of Karonda | आरोग्यासाठी अमृत समान आहे ‘हे’ छोटे लाल फळ,
कॅन्सरपासून सुद्धा वाचवू शकते, कसे वापरावे जाणून घ्या