Benefits of Karonda | आरोग्यासाठी अमृत समान आहे ‘हे’ छोटे लाल फळ, कॅन्सरपासून सुद्धा वाचवू शकते, कसे वापरावे जाणून घ्या

नवी दिल्ली : Benefits of Karonda | करवंद हे एक मौल्यवान फळ असून ते अमृत समान आहे. झुडपाप्रमाणे असलेली त्याची झाडे हिमालय, पश्चिम घाट, बिहार, बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये आढळतात. (Benefits of Karonda)

करवंदामध्ये इतके औषधी गुणधर्म आहेत की त्याद्वारे कॅन्सरसारखे आजारसुद्धा टाळता येतात. कच्चे करवंद हिरवट-पिवळ्या रंगाचे असते. पण पिकताच ते अतिशय सुंदर गोल गरगरीत लाल रंगाचे बनते. इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चर रिसर्चच्या मते, करवंदामध्ये आयर्न, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी मुबलक असते.

हे अँटीस्कॉर्ब्युटिक आहे. म्हणजेच अशक्तपणाच्या उपचारात करवंद खूप फायदेशीर आहे. छातीत दुखत असेल तर करवंदाचा उपचार केला जातो. इंडियन हॉर्टिकल्चर रिसर्चनुसार, करवंदाची पाने तापावर रामबाण आहेत. छातीत दुखण्यावर करवंदाची मुळे वापरून उपचार केला जातो. करवंद सुरुवातीला आंबट असते पण पिकल्यावर आंबट-गोड होते. करवंदापासून जॅम, जेली, स्क्वॅश, सिरप, चटणी, लोणचे इत्यादी बनवले जाते.

करवंदाचे फायदे

१. पचनासाठी फायदेशीर –
इंडियन एक्सप्रेसने एक्सपर्टचा संदर्भ देत म्हटले आहे की करवंदामधील सोल्यूबल फायबरमुळे पचन सुधारते. यातील पेक्टिन नावाचे फायबर बद्धकोष्ठता, पोटदुखी इत्यादी दूर करते.

२. मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त –
करवंदामधील मॅग्नेशियम, व्हिटॅमिन आणि ट्रिप्टोफॅन हे न्यूरोट्रांसमीटर सेरोटोनिनचे उत्पादन वाढवतात, ज्यामुळे संपूर्ण मानसिक आरोग्य सुधारते. मूड सुधारतो.

३. अँटी-इम्फ्लेमेटरी –
करवंदामध्ये अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे सूज संबंधित सर्व समस्यांमध्ये ते फायदेशीर आहे. सूजमुळे अनेक क्रोनिक आजार होतात.

४. अँटी-कॅन्सर गुणधर्म –
एनसीबीआय जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, करवंदाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट,
अँटीकार्सिनोजेनिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.
म्हणजेच कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठी करवंदाची पाने गुणकारी आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

1 August Rashifal : मेष आणि मिथुनसह या ५ राशीवाल्यांसाठी महिन्याचा पहिला दिवस चांगला, मिळेल यश