Aditya Roy Kapur And Ananya Pandey | मुलगी अनन्या व आदित्यच्या अफेअरवर अभिनेते चंकी पांडेंनी सोडले मौन

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचे सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारे कपल म्हणजे अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Aditya Roy Kapur And Ananya Pandey). आदित्य आणि अनन्या यांच्या अफेअरच्या (Aditya And Ananya Affair) चर्चा अनेक दिवसांपासून चालू होत्या. मात्र त्यांचे स्पेन मधील रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या रिलेशनची खात्री पटली आहे. बी टाऊनचे हे लवली कपल (Bollywood Couple) अनेकदा एकमेंकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत असले तरी अद्याप अनन्या व आदित्यने त्यांच्या नात्याबद्दल कबुली दिलेली नाही. आता त्यांच्या नात्याबद्दल अनन्या पांडेचे वडील अभिनेते चंकी पांडे (Chunky Panday) यांनी मौन सोडले आहे. चंकी पांडे यांनी अनन्या व आदित्य रॉय कपूरच्या अफेअरवर (Aditya Roy Kapur And Ananya Pandey) प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य व अनन्या हे कपल आता लाईमलाईटमध्ये आले आहे. परदेशातील फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना हे कपल खूप आवडत आहे. यावर अनन्याचे वडील चंकी पांडे यांना (Chunky Panday On Ananya Affair) एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, “जेव्हा तुम्ही या ग्लॅमर इंडस्ट्रीत काम करत असता तेव्हा अशा गोष्टी नेहमी घडत राहतात. अशा बातम्या पसरण्याची शक्यता जास्त असते आणि ते कोणीही थांबवू शकत नाही.” चंकी पांडे यांना ऑन स्क्रिन अनन्या पांडेबरोबर कोणता अभिनेता चांगला दिसतो असा देखील प्रश्न करण्यात आला. यावर त्यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले “ ‘पती पत्‍नी और वो’ या चित्रपटामध्ये अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर (Kartik Aaryan) अनन्या चांगली दिसत होती.”

अभिनेत्री अनन्या पांडे व आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur And Ananya Pandey) हे लॉन्ग व्हेकेशनला जाऊन आले आहेत. आल्यानंतर ते दोघे मुंबईमध्ये बार्बी हा चित्रपट (Barbie Movie) बघण्यासाठी फिल्म डेटवर (Aditya And Ananya Movie Date) देखील गेले होते. आता मात्र ते कामाला लागले असून दोघे देखील लवकरच प्रेक्षकांसमोर नवे चित्रपट घेऊन येणार आहे. आदित्य रॉय कपूर लवकरच ‘मेट्रो इन दिनों’ (Metro In Dino) मध्ये भूमिका साकारणार असून यामध्ये सारा अली खान (Sara Ali Khan) स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच अनन्या पांडे (Ananya Pandey) ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) मध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. तिचा हा ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपट येत्या 25 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार (Dream Girl 2 Release Date) आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitin Desai Death Case | नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट ! पत्नीची रायगड पोलिसांत तक्रार; फायनान्स कंपनीविरुद्ध FIR