Nitin Desai Death Case | नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट ! पत्नीची रायगड पोलिसांत तक्रार; फायनान्स कंपनीविरुद्ध FIR

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – Nitin Desai Death Case | ज्येष्ठ कला दिग्दर्शक (Art Director) नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर (Nitin Chandrakant Desai Suicide Case) त्यांच्या पत्नीने रायगड पोलिसांकडे (Raigad Police) तक्रर दाखल (FIR) केली आहे. फायनान्स कंपनीच्या (Finance Company) पदाधिकाऱ्यांनी वारंवार पैशासाठी तगादा लावल्यानेच नितीन देसाई यांनी आत्महत्या केली, असा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फायनान्स कंपनीच्या मानसिक त्रासाला कंटाळूनच देसाई यांनी आत्महत्या (Nitin Desai Death Case) केली, असे तक्रारीत नमूद केलं आहे. त्यामुळे आता या तक्रारीची दखल घेऊन खालापूर पोलीस ठाण्यात (Khalapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एन.डी. फिल्म स्टुडीओचे (N.D. Film Studio) मालक नितीन देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी स्टुडिओतच आत्महत्या (Nitin Desai Death Case) केली होती. ते कर्ज वसुलीच्या तगाद्याने त्रस्त होते. यावर देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई (Wife Neha Desai) यांनी खालापुर पोलीस ठाण्यात फायनान्स कंपनीविरोधात तक्रार दिली आहे. ECL फायनांन्स कंपनी (ECL Finance Company)/एडलवाईज ग्रुपचे (Edelweiss Group) पदाधिकारी यांनी कर्ज प्रकरणामध्ये (Loan) वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिला. त्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असे नेहा देसाई यांनी तक्रारीत म्हटले आहे.

नेहा देसाई यांच्या तक्रारीवरुन खालापूर पोलीस ठाण्यात 269/2023 आयपीसी 306, 34 अन्वये ECL फायनान्स कंपनी / एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी आणि इतर अशा एकूण पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास खालापूर विभागाचे (Khalapur Division) उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम (Sub Divisional Police Officer Vikram Kadam) हे करीत आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड-अलिबाग यांच्याकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, नितीन दसाई यांच्या कंपनीवर कर्ज होतं. नोव्हेंबर 2016 मध्ये नितीन देसाई
यांच्या कंपनीने एडलवाईस एआरसीकडून 150 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.
त्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये ईसीएल फायनान्सकडून पुन्हा
अतिरिक्त 35 कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले. जानेवारी 2020 पासून कर्जाचे हप्ते थकू लागले.
त्यांच्या कंपनीवर एकूण 252 कोटी रुपयांची थकबाकी होती.
त्यासाठी जुलै 2022 मध्ये एनसीएलटीकडे याचिका दाखल करण्यात आली होती,
असं एडलवाईस एआरसीने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं होतं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sai Tamhankar | अभिनेत्री सई ताम्हणकरने सांगितल्या तिच्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा; व्हिडिओ व्हायरल