Aditya Thackeray | विरोध करणाऱ्यांवर हल्ले करा, हे राज्य सरकारचे धोरण; भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्यानंतर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्या चिपळूण येथील घरावर अज्ञातांनी मंगळवारी रात्री उशिरा पेट्रोलच्या बाटल्या आणि दगडांनी हल्ला केला. त्यावर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोध करणाऱ्यांवर हल्ले करा, हे धोरण राज्य सरकारचे आहे, असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

 

भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करण्यापूर्वी त्यांच्या घराची पोलीस सुरक्षा, स्थानिक सुरक्षा काढून घेतली गेली. त्यानंतर दोन तासांनी हा हल्ला झाला. या हल्ल्याला राजकीय पाठबळ आहे का? राजकीय यंत्रणा यामागे काम करत आहेत का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. हा एक भ्याड हल्ला होता. राजकीय जीवनात आरोप, प्रत्यारोप, टीकाटिप्पणी होत असते, पण अशा प्रकारचे हल्ले म्हणजे यंत्रणेचा गैरफायदा घेऊन केलेले हल्ले आहेत. यातून यंत्रणेचा दुरुपयोग होत असल्याचे समोर येत आहे, असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

 

ज्या प्रश्नांवर राज्य सरकारला उत्तर देता येत नाही,
महाराष्ट्रासाठी सामान्य माणसासाठी जो बोलतोय त्याच्या प्रश्नाला उत्तर नसेल, तर असे हल्ले घडवून आणले जात आहेत.
सरकार महागाईवर उत्तर देत नाही. जे प्रश्न विचारतात, त्यांच्याविरोधात चौकशी लावली जाते, हल्ला केला जातो.
मला वाटते राज्याचे राजकारण येवढ्या खालच्या पातळीवर कधीच गेले नव्हते.
आपल्या राज्यात कधीही कायदा व सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण झाला नव्हता.
पण घटनाबाह्य सरकार असल्याने या सर्व गोष्टी होत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- Aditya Thackeray | aditya thackeray reacted to the incident of attack on bhaskar jadhavs house

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhaskar Jadhav | घरावरील हल्ल्यानंतर प्रथमच भास्कर जाधव माध्यमांसमोर; देवेंद्र फडणवीसांवर केले गंभीर आरोप

Vinayak Raut | शिवसैनिकांवरील हल्ल्याला आंदोलनाने उत्तर देऊ, खा. विनायक राऊत यांचा इशारा

Mallikarjun Kharge | मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस पक्षाचा सुवर्णकाळ निर्माण करतील, मोहन जोशी यांच्याकडून खर्गेंना शुभेच्छा