Vinayak Raut | शिवसैनिकांवरील हल्ल्याला आंदोलनाने उत्तर देऊ, खा. विनायक राऊत यांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या राजकारणात आताच्या घडीला भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) मतभेद आणि वाद चव्हाट्यावर आले आहेत. आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या घरावर चिपळूणमध्ये हल्ला झाला आहे, त्यावर ठाकरे गटाने संताप व्यक्त केला. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी याबद्दल भाष्य केले आहे. शिवसैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न यापुढे जर कोणी केला, तर तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिला आहे.

भास्कर जाधव हल्ले झेलण्यासाठी समर्थ आहेत. पण कोणत्याही परिस्थितीत ते गद्दार आणि भ्रष्टाचाऱ्यांची लक्तरे वेशीवर टांगल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. भास्कर जाधव अथवा कोणत्याही शिवसैनिकावर हल्ला झाला, तर आम्ही गप बसणार नाही. हल्लेखोरांना तिथल्या तिथे उत्तर दिले जाईल. नारायण राणे (Narayan Rane) आणि भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांबद्दल राजकीय परिस्थिती मांडली म्हणून भास्कर जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही व्यक्तीस्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्याची पायमल्ली आहे. शिंदे यांच्या सरकारकडून आमचे नेते, उपनेते आणि शिवसैनिकांवर गुन्हे (FIR) दाखल करण्यात येत आहेत. अशा रितीने तोंड बंद करण्याचा प्रयत्न होत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही, प्रत्युत्तर देऊ, असे विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले.

भास्कर जाधव यांच्या घराबाहेर दोन पोलीस शिपाई बंदोबस्तासाठी ठेवले होते.
परंतु रात्री अचानक बंदोबस्त का हटविण्यात आला, पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का, असे प्रश्न विनायक राऊत यांनी उपस्थित केले.
या हल्ल्यामागे असलेल्यांना तात्काळ ताब्यात घ्या, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेतला जाण्याचे देखील विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.

Web Title :- Vinayak Raut | shivsena mp vinayak raut reaction over attacks on mla bhaskar jadhav house at chiplun

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा