Aditya Thackeray | उद्धव ठाकरे राजकारणी झाले नसते तर… आदित्य ठाकरेंनी दिले उत्तर, मातोश्रीतील किस्से सांगत उलगडले बाप-लेकाचे नाते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वडील म्हणून कसे आहेत, असा प्रश्न आदित्य (Aditya Thackeray) यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने उत्तर दिले. यावेळी बाप-लेकातील नाते उलगडून सांगताना आदित्य (Aditya Thackeray) यांनी मातोश्रीवरचे (Matoshree) अनेक किस्सेदेखील सांगितले. ते मुंबईत आयोजित एका कार्यक्रमातील मुलाखतीला उत्तरे देत होते.

 

उद्धव ठाकरे आणि आपल्यातील बाप-लेकाचे नाते उलगडताना आदित्य (Aditya Thackeray) म्हणाले, उद्धवजी अतिशय हुशार आहेत. मी कायद्याचा अभ्यास केला आहे. लॉ केले आहे. त्यामुळे अनेक मुद्द्यांवर मी आणि उद्धवजी घरी डिबेट करतो. ते दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करू शकतात आणि अतिशय उत्तमपणे करू शकतात. त्यांना वैद्यकीय क्षेत्राबद्दल (Medical Field) खूप माहिती आहे.

 

ते पुढे म्हणाले, कोविड काळात त्यांचे ज्ञान आपण सगळ्यांनी पाहिले. त्यामुळे अनेकदा मी त्यांना गमतीने म्हणतो, तुम्ही राजकारणी झाला नसता, तर कायदेतज्ज्ञ (Lawyer) किंवा डॉक्टर (Doctor) झाले असतात.

आदित्य ठाकरे म्हणाले, कोविड आधी सार्कचा धोका निर्माण झाला होता. त्यावेळीही उद्धव ठाकरेंनी सर्व महापालिकेतील आरोग्य अधिकार्‍यांशी संवाद साधला होता. त्यांच्या बैठका घेतल्या. एक इंजेक्शन देणे सोडले तर त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील प्रचंड माहिती आहे. ते खूप वाचन करतात. संशोधन करतात. खूप बारकाईने काम करण्याची त्यांची सवय आहे.

 

आदित्य पुढे म्हणाले, वडिलांसोबत, आजोबांसोबत मी लहानपणापासून खूप फिरलो आहे. दौरे केले आहेत.
आजोबांसोबत बैठकांमध्ये सहभागी झालो आहे. त्यावेळीही माझ्या माणसाला तिकीट मिळाले नाही.
दुसर्‍याच्या माणसाला दिले, अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन पदाधिकारी घेऊन घ्यायचे.

 

त्यावेळी उद्धवजींनी मला एक गोष्ट सांगितली होती. पक्षात माझा माणूस, तुझा माणूस असे काही नसते.
सगळे आपले असतात. तिकीट देताना मेरीटवर द्यायचे. कोणी पक्षासाठी काम केले आहे ते पाहायचे.
त्याचा जात, धर्म पाहायचा नाही, ही शिकवण उद्धवजींना मला दिली आहे, असे आदित्य म्हणाले.

 

Web Title :-  Aditya Thackeray | have very good knowledge of law and medical aaditya thackeray praises father uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Deshmukh | शिवसेनेत प्रवेश करताच संजय देशमुखांनी केली मोठी घोषणा, म्हणाले- ‘आगामी काळात…’

Dhananjay Munde | पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? धनंजय मुंडेंनी दिले मार्मिक उत्तर

British PM Liz Truss | ब्रिटनमध्ये राजकीय भूकंप, पंतप्रधान लिझ ट्रस यांचा तडकाफडकी राजीनामा