Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंची खोचक टीका, पुढचा खासदार येईपर्यंत नारायण राणे भाजपमध्ये राहतील का?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुढचा खासदार निवडून येईपर्यंत नारायण राणे (MP Narayan Rane) स्वतः भाजपमध्ये (BJP) राहतील की नाही हाच प्रश्न आहे. हा त्यांचा आतापर्यंतचा चौथा पक्ष आहे. प्रत्येकवेळी आमच्याबद्दल वाईट बोलायचे, हेच त्यांचे काम आहे. त्यांच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. आम्ही कामांवर लक्ष देतो, असा टोला आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावला आहे. ते अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात (Andheri East by-Election) प्रचारासाठी आले असताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पत्रकारांशी बोलत होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते की, यापुढे मुंबईत शिवसेनेचा (Shivsena) एकही खासदार निवडून येणार नाही. या वक्तव्यावरून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राणे यांना खोचक प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Election) घेण्याची खोके सरकारची तयारी दिसत नाही. सध्या लोकप्रतिनिधी नसताना वेगवेगळी टेंडर आणि वेगवेगळी कामे होत आहेत. लोकशाहीत असे चालत नाही. प्रशासकाच्या जागी महापौर बसायला हव्यात आणि नगरसेवकांच्या पदावर लोक हवेत. यासाठी निवडणुका होणे, गरजेचे आहे. सध्या लोकशाहीत जे काही होत आहे, ते धोकादायक आहे.

शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, कोस्टल रोड असेल, वरळी शिवडी कनेक्ट असेल किंवा इतर कामे असतील, ही कामे आम्ही सुरू केलेली होती.
आमची पद्धत अशी होती की, दररोज अपडेट यायची, आठवड्यात आढावा मिटींग व्हायची.
या सरकारला कुठेही अशा कामात रस दिसत नाही. काम कमी आणि राजकारणच जास्त सुरू आहे.

आदित्य पुढे म्हणाले, जे काही राज्यात सुरू आहे, त्यानुसार शिवसेना फोडा, शिवसेनेला कमजोर करा,
ठाकरे परिवाराला बाजूला करा, जे जे महाराष्ट्रासाठी आवाज उठवत आहेत त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न होत आहे.
हे असेच जर सुरू राहीले तर महाराष्ट्राचे 5 ते 6 तुकडे होतील.

Web Title :- Aditya Thackeray | uddhav thackeray camp leader aaditya thackeray hits back bjp narayan rane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा