कौतुकास्पद ! IAS होईपर्यंत लग्न करणार नाही म्हणणार्‍या अभिलाषानं 18 वा रँक मिळवूल साकार केलं स्वप्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या(Bihar)  अभिलाषाचे (Abhilasha) स्वप्न होते की, एका चांगल्या सरकारी पदावर काम करेल. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने यूपीएससीची (UPSC) परीक्षाही दिली. 2014 मध्ये, अभिलाषाने पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली होती, त्यावेळी तिला प्री क्लियर करता आले नाही. तरीही तिने हार मानली नाही आणि सतत संघर्ष सुरू ठेवला.

अभिलाषाला तिच्या कुटूंबाला आणि समाजाला उत्तर देण्यासाठी लवकरात लवकर सर्वोत्तम निकाल आणायचा होता. पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतरही ती प्रयत्न करत राहिली आणि 2 वर्षे तयारी चालू ठेवली. यानंतर, 2016 मध्ये अभिलाषाने पुन्हा नशीब आजमावले आणि 308 वा रँक मिळविला. यामुळे आयआरएस सेवेसाठी अभिलाषाची निवड झाली, परंतु अभिलाषा अद्याप समाधानी नव्हती. उच्च पदावर काम करण्याचे अभिलाषाचे स्वप्न होते.

18 वा रँक मिळवून पूर्ण केले स्वप्न
अभिलाषा पुन्हा एकदा प्रयत्न करत राहिली. 2017 मध्ये तिसर्‍या प्रयत्नात तिने यश संपादन केले. तिच्या अथक परिश्रम आणि प्रयत्नांमुळे अभिलाषाने 18 वा रँक मिळविला. अशाप्रकारे अभिलाषाने तिच्या बालपणीचे स्वप्न पूर्ण केले. अभिलाषाने कुटूंबाचा पाठिंबा मिळवून आणि सतत प्रयत्न करून असे यश संपादन केले. यानंतर संपूर्ण समाज तिचे कौतूक करीत आहे.

अभ्यासाबरोबर नोकरीही
अभिलाषा नेहमी वाचनात चांगली होती. अभिलाशाने दहावी व बारावीत प्रथम क्रमांक पटकाविला होता. यानंतर तिने अभियांत्रिकी परीक्षेचीही तयारी केली. परीक्षा दिल्यानंतर महाराष्ट्रातून बीटेकही केले. बीटेक नंतर नोकरीही होती. नोकरीबरोबरच तिने नेहमीच तयारी सुरू ठेवली. पण जेव्हा ती यशस्वी झाली नाही तेव्हा कुटुंबीयांनी तिला लग्न करण्यासाठी भाग पाडण्यास सुरुवात केली. अभिलाषाने तिच्या कुटुंबीयांना लग्न पुढे ढकलण्यासाठी राजी केले आणि आणखी मेहनत सुरू केली. या सर्वांमुळेच आज ती सर्वांसाठी प्रेरणादायक असल्याचे सिद्ध झाले आहे आणि समाजातील टोमणे मारणा-या सर्वांना उत्तरे दिली आहेत.