मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील भाजपचा एक बडा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्या चर्चेला अखेर आज (दि.२७) पूर्णविराम लागला. नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, भाजपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांनी आज मुंबईतील शिवसेना भवन येथे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी, खासदार संजय राऊत (Sanjay Raut), खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant), खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) उपस्थित होते. यावेळी बोलताना अद्वय हिरे (Advay Hire) यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
मा.श्री. अद्वय आबा हिरे पाटिल यांचा पक्षप्रवेश । शिवसेना भवन, दादर – #LIVE ⬇️
🚩 शिवसेना परिवारामध्ये आपले स्वागत आहे 🙏 #UddhavThackeray @advay007 #ठाकरेपरिवार #कुटुंबप्रमुख #आपलीशिवसेना #MAHARASHTRA
[ शुक्रवार – 2️⃣7️⃣ जानेवारी 2️⃣0️⃣2️⃣3️⃣ ] https://t.co/wfMrD5dHGc
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) January 27, 2023
यावेळी बोलताना अद्वय हिरे म्हणाले, ‘२००९ साली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाची लोकसभेची जागा निवडून देण्याची विनंती केली. तेव्हापासून मी भाजपाबरोबर काम करत आहे. भाजपामध्ये गेल्यावर सर्वजण पक्ष सोडून गेले होते. देशात सोनिया गांधींना (Sonia Gandhi) पंतप्रधान करण्याची लाट होती. अशा परिस्थितीत मंत्र्याला लोकसभेत पाडून भाजपाचा उमेदवार निवडून आणला. सरपंच, जिल्हा परिषदमध्ये भाजपाची सत्ता आणली. पण, आता ५० गद्दार भाजपाच्या मांडीवर बसल्यापासून त्यांना आमची गरज राहिली नाही.’ अशी घणाघाती टीका अद्वय हिरे यांनी यावेळी बोलताना भाजपवर (BJP) केली आहे.
पुढे बोलताना हिरे (Advay Hire) म्हणाले की, ‘मी कधीही कोणत्याही व्यक्तीगत पदासाठी भाजपकडे मागणी केली
नाही. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली. तेव्हा आंदोलन करण्यात आलं.
पक्षाने शतकऱ्याला मरू दिलं. मात्र, वाचविण्यासाठी भाजपचे सरकार उभं राहू शकलं नाही.
त्यामुळे भाजपचा त्याग केला. असंही यावेळी बोलताना अद्वय हिरे म्हणाले.
आज पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील श्री.अद्वय (आबा) हिरे पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. pic.twitter.com/G2gOtXnIyZ
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) January 27, 2023
तर, ‘कालपासून भाजपला माझी अचानक आठवण झाली. प्रदेशाध्यक्षांपासून सर्वांचे फोन आले.
त्यांनी मी स्पष्टपणे म्हटलं की, कितीही खोके, कितीही सत्ता दिली तरी उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द मोडणार नाही. पैसा आणि सत्तेसाठी बाप बदलणारी अवलाद माझी नाही.
उत्तर महाराष्ट्रात शिवसेना पक्ष उभा करण्यासाठी काम करू.
तसेच येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना
बसविल्याशिवाय राहणार नाही.’ असेही यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.
तर त्यापुढे बोलताना अद्वय हिरे म्हणाले की, ‘शिवसेना सोडून लोकं निघूण जात आहेत, हा गैरसमज आहे.
जे गद्दार गेले आहेत, त्यांना जनता धडा शिकवणार आहे. मी आता बाहेर पडलोय, पण ४९ मतदारसंघात भाजपचे
नेते थांबले आहेत, ज्यांची कुंचंबना होत आहे. निवडणुका जाहीर झाल्यावर ४९ मतदारसंघातून हे लोक
शिवसेनेत प्रवेश करतील.’ असा दावा देखील यावेळी बोलताना अद्वय हिरे यांनी केला.
Web Title :- Advay Hire | nashik bjp leader advay hire join shivsena uddhav thackeray attacks shinde group and bjp
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update