न्या. गोगोई यांना सरन्यायाधीश करण्याच्या विरोधात वकिलाची सुप्रीम कोर्टात याचिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

काही महिन्यांपूर्वी न्या. गोगोई आणि इतर तीन वरिष्ठ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन न्या. मिश्रा यांच्या कारभाराबद्दल उघड नाराजी व्यक्त केली होती. असे करणे हे नियमांचे उल्लघंन आहे. यामुळे त्यांना सरन्यायधीश बनवण्यात येऊ नये, असा मुद्दा उपस्थित करत एका वकिलाने न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’83822948-c150-11e8-8df5-636ed24e2782′]

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. रंजन गोगोई हे आता नवे सरन्यायाधीश असणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. ३ ऑक्टोबरला रंजन गोगोई सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली होती. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे परिषदेत न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावरच तोफ डागली होती.

आधार कार्ड वैधतेबाबत सुप्रीम कोर्ट आज अंतिम फैसला

यामुळे लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असलेल्या न्यायपालिकेतच भूकंप झाला होता. सर्वोच्च न्यायालयाचा कारभार व्यवस्थित चालत नाही. असेच सुरू राहिले किंवा न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाहीही टिकणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश चेलमेश्वर म्हणाले होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ या चार न्यायाधीशांनी अचानक पत्रकार परिषद बोलावून सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर चिंता व्यक्त केली होती. त्यांनी सरन्यायाधीशांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या प्रकारानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती.

[amazon_link asins=’B01N29JK5P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1740bbde-c151-11e8-b782-a3031c99aa85′]