Advocate Gunaratna Sadavarte | शिंदे गटाच्या आमदाराचे प्रक्षोभक विधान, सदावर्तेंची गाडी तोडली ही शिक्षा कमीच, ‘त्यापेक्षा त्याला…’

मुंबई : मराठा समाज आरक्षणावरून (Maratha Reservation) आक्रमक झाला असून ठिकठिकाणी साखळी उपोषण आणि राजकीय नेत्यांना गावबंदी केली जात आहे. यामुळे राज्यातील वातावरण तापू लागले आहे. दरम्यान, काही लोकांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वकील गुणरत्न सदावर्तें (Advocate Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची तोडफोड केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर शिंदे गटाच्या आमदाराने (Shinde Group MLA) प्रक्षोभक विधान केले आहे. सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांच्याविरोधात आता शिंदे गटाचे आमदार देखील प्रतिक्रिया देऊ लागले आहेत, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड झाल्यानंतर प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर सतीश मानशिंदे (Criminal Lawyer Satish Manshinde) यांनी सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्या आंदोलकांची केस फुकट लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी सदावर्तेंबाबत प्रक्षोभक विधान केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले की, गुणरत्न सदावर्ते यांच्या स्वभावामुळे महाराष्ट्रातील गोरगरीब मराठ्यांचे आरक्षण हिसकावले गेले. सदावर्ते यांनी प्रखरपणे आरक्षणाविरोधात कोर्टात बाजू मांडली. सदावर्ते सूडाने पेटले होते. यांची जी गाडी तोडली ही शिक्षा कमी आहे. गुणरत्न सदावर्तेंना (Advocate Gunaratna Sadavarte) संपवायला हवे होते, त्यांना संपवले असते तर मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता.

गायकवाड म्हणाले, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की,
ते शांततेने आंदोलन करतील. मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात लाखो लोकांच्या साक्षीने,
शिवरायांच्या समोर शपथ घेऊन सांगितले की, मी आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.
घाईघाईने आरक्षण दिल्यास मोठे नुकसान होईल. प्राण जाए पर वचन ना जाए, अशा प्रवृतीचे मुख्यमंत्री आहेत. सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवावा.

दरम्यान, शिंदे गटाचे आणखी एक नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी म्हटले आहे की, नेत्यांना गावबंदी हा
पर्याय असू शकत नाही. सुख दुःख कार्यक्रमात जावे लागेल. सामाजिक धार्मिक, लग्न कार्यात जावे लागेल. असे करू नका.
शेवटी राजकारणात व्यक्ती स्वतंत्र आहे. घटनात्मक अधिकार हिरावून घेऊ नका.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | मंत्री चंद्रकांत पाटील हे मिलिंद तुळाणकर यांच्या जलतरंगाने प्रभावित