Afghanistan Crisis | तालिबानी शासकांच्या भितीने अफगाणी नागरिक देश सोडण्यासाठी अस्वस्थ, पहा हृदयात धडकी भरवणारा व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Afghanistan Crisis | अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे क्रूर शासन परतल्याच्या भितीने हजारो अफगाण नागरिक हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देश सोडण्याचा प्रयत्न (Afghanistan Crisis) करत आहेत. काहीही करून एयरपोर्टवरून उड्डाण घेणार्‍या विमानात बसून देशातून बाहेर पडण्यासाठी ते अस्वस्थ आहेत.

इतकेच नव्हे तर आपल्या जीवाची सुद्धा परवा करताना दिसत नाहीत. याच कारणामुळे विमानात जागा न मिळाल्यास ते विमानाच्या बाहेरील एखाद्या भागाला पकडून बाहेर पडण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ दिसत आहेत.

असाच एक व्हिडिओ ट्विटरवर टोलो न्यूजचे प्रमुख लुतफुल्लाह नजाफीजादा यांनी शेयर केला आहे, ज्यामध्ये दिसत आहे की अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याच्या घाईत नागरिक कशाप्रकारे रनवेवर ÷ उड्डाण घेणार्‍या अमेरिकन हवाई दलाच्या विमानाच्या बंद दरवाजाच्या जवळपास चढण्याचा प्रयत्न करत आहेत, तर असंख्य लोक विमानासोबत धावत आहेत. व्हिडिओमध्ये लोक विमानात बसण्यासाठी कशी कसरत करत आहेत ते दिसत आहे.

दुसरीकडे, काबुल विमानतळावर किमान आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकन सैनिकांनी हामिद करजई अंतरराष्ट्रीय विमानतळावर हवेत गोळीबार केला परंतु जेणेकरून नागरिकांना अफगाणिस्तानच्या हवाई वाहतुकीवर कब्जा करण्यापासून रोखता यावे.

मात्र, हे स्पष्ट झालेले नाही की मृत लोकांना गोळी लागली की चेंगराचेंगरीत ठार झाले. सर्व व्यावसायिक सेवा आता निलंबित केल्या आहेत, केवळ यूके, यूएस आणि इतर पश्चिमी देशांची सैन्य उड्डाणे आपल्या नागरिकांना घेऊन जात आहेत.

अफगाण रेडियो रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,
काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मार्ग हजारो लोकांनी भरून गेला आहे.
जे देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत.
हजारो इतर लोक राजधानीच्या एकमेव पासपोर्ट कार्यालयाच्या बाहेर किलोमीटरपर्यंतच्या रांगेत उभे आहेत,
जे प्रवासाची कागदपत्र सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
जवळपास 50 लाख लोक काबुल शहराच्या चारही बाजूने शेवटच्या क्षणी घरातून पळण्याचा प्रयत्न करत आहेत.

काबुलमध्ये भय आणि दहशतची स्थिती स्पष्ट आहे.
कारण तालिबानने असंख्य हल्ले केल्यानंतर राजधानीकडे मोर्चा वळवला आहे,
त्यांनी मोठे क्षेत्र काबिज केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Afghanistan Crisis | अफगाणिस्तान सोडण्याची घाई पडली महागात, उडणार्‍या विमानातून पडले तीन लोक, टायर पकडून लटकले होते (व्हिडीओ)

Sharad Pawar | शरद पवार यांनी दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला

Pune Police | चोरीच्या गुन्ह्यातील जप्त केलेल्या वस्तूंचा पुणे पोलिसांकडून लिलाव

 

BHR Scam | बीएचआर घोटाळा ! भाजपचे आमदार चांदूलाल पटेल यांचा अटक पूर्व जामीन मंजूर

 

बाप तो बाप असतो ! राज ठाकरेंबद्दल चुकीचे शब्द वापराल तर पुणे शहरात फिरून देणार नाही…