अंकिताशी ब्रेकअप झाल्यानंतर सुशांतचं आणि क्रिती ‘सूत’ जुळलं पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला वांद्रे येथील आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट असून त्याचा तपास सीबीआय करत आहे. तथापि, सुशांतची एक नोट सापडली असून, त्यामध्ये त्याने बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला आहे. पण त्यातील एक गोष्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या नोटमध्ये क्रिती सनॉन सोबत जास्त वेळ व्यतीत केल्याचं सांगितलं आहे.

सुशांत आणि क्रिती यांचे संबंध कुणासमोर लपून राहिले नव्हते. म्हणून सुशांतच्या निधनानंतर क्रितीने खुलून नाही पण इशाऱ्यांमधून पोस्टमध्ये त्याच्या आठवणींना उजाळा दिला होता.

‘राब्ता’च्या वेळी आले होते जवळ
सुशांत आणि क्रिती यांनी २०१७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपट राब्तामध्ये काम केलं होत. यापूर्वी या सिनेमासाठी आलिया भटला विचारण्यात आलं होत. मात्र, परत हा सिनेमा क्रितीला मिळाला. २०१६ साली या चित्रपटाच्या शुटिंगवेळी सुशांत आणि क्रितीच्या रिलेशनशीप बद्दल चर्चा होऊ लागल्या होत्या. त्याच वेळी सुशांतचे त्यांची गर्लफ्रेंड अंकितासोबत नाते संपण्याच्या मार्गावर आले होते. शेवटी २०१६ साली सुशांत आणि अंकिताचे सहा वर्षाचे जुने नाते संपले. मग सुशांत क्रिती सोबत वेळ घालवू लागला.

‘राब्ता’नंतरही क्रिती व सुशांतचे बॉण्डिंग झाले चांगले
राब्ता चित्रपट जरी बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला असला तरी सुशांत आणि क्रितीचे संबंध खूप चांगले होत होते. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिती सुशांतला भेटायला त्याच्या अपार्टमेंट यायची. २०१७ साली क्रितीच्या वाढदिवसा दिवशी सुशांतच्या घरी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा दोघे मित्र आणि कुटूंबासोबत मजामस्ती करताना दिसले होते.

मैत्रीच्या पलीकडे काही नाही…
क्रितीच्या कुटुंबियांना भेटण्यास सुशांत तिच्या घरी गेला होता. त्यानंतर त्यांच्या अफेअर बाबत चर्चांची जोर धरला होता. पण त्या दोघांनी कधीच त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. त्यांनी नेहमीच त्याच्यात मैत्रीचे नाते असल्याचे सांगितले.

निराधार वृत्त
सुशांतने एकदा म्हटलं होत की, माझ्या व क्रिती बाबतच्या बातम्या खूप इंटरेस्टिंग आहेत पण निराधार आहेत. आम्ही दोघे दिल्लीचे आहोत आणि खूप फुडीसुद्धा आहोत. ती इंजिनिअर होती आणि मी चित्रपटात येण्याआधी इंजिनिअरिंगशी जोडलेले होतो. म्हणून आमचे खूप जमते. क्रिती ने देखील समाज माध्यमात सुशांत सोबत रिलेशन शिपमध्ये असल्याचे वृत्त नाकारले होते. ती म्हणाली, आम्ही सहकलाकार एकमेकांचा आदर करतो. या निराधार वृत्तामध्ये कोणतेही सत्य नाही. धन्यवाद.

लीसा मलिकने केला दावा
अभिनेत्री लीसा मलिकने दावा करत म्हटलं होत की, सुशांत आणि क्रिती जरी मान्य करत नसतील, पण दोघे सुद्धा एकमेकांना डेट करत होते. दोघे आनंदी होते. लीसाच सुशांतसोबत प्रोफेशनल रिलेशन होते. तिने सांगितलं, दोघे एका बर्थडे पार्टीत फार आनंदी होते. लीसाने न्यूज एजन्सी IANS ला सांगितले की, मी सुशांतला साधारण अडीच वर्षांआधी भेटले होते. तेव्हा तो क्रितीसोबत होता. क्रितीची बर्थडे पार्टी होती. बांद्रा क्लबमध्ये सेलिब्रेशन होतं. तो नेहमीच एक चार्मिंग व्यक्ती होता जो पार्ट्यांमध्ये जाऊन लोकांच्या चेहऱ्यावर स्माइल आणत होता. आमचे अनेक कॉमन फ्रेन्ड्स होते जसा महेश शेट्टी.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like