मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत ‘डझनभर’ आमदार नाराज असल्याची चर्चा

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले. सरकार स्थापन झाल्यानंतर बहुचर्चीत मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, या विस्तारानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने शिवसेनेतील डझनभर आमदार नाराज असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. नाराज आमदारांना शांत करण्याचे मोठे आव्हान आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे. नाराज आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे.
नाराज आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ मागणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्तक्षेपामुळे आपल्याला डावले गेले असल्याची कुजबुज नाराज आमदारांमध्ये आहे. तसेच मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने शिवसेनेचे आमदार नाराज असल्याचीही चर्चा आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या अगोदर खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांचे नाव चर्चे होते. मात्र त्यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान मिळाले नसल्याने खासदार संजय राऊत नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर संजय राऊत आणि सुनिल राऊत यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट करत चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र, त्यानंतर रामदास कदम हे देखील आपल्या शिवसेना नेते पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. तर भास्कर जाधव, प्रताप सरनाईक आणि भावना गवळी यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले नाराज आमदार ?
प्रताप सरनाईक – मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने प्रताप सरनाईक यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. कदाचित आपली निष्ठा कमी पडली असेल, तर आगामी काळात ती दखवून देऊ अशा शब्दात प्रताप सरनाईक यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

भास्कर जाधव- सत्तेमध्ये मी नाही पण, सत्ताधारी पक्षामध्ये मी आहे. मी उद्धव ठाकरेंना विचारणार आहे की मी कुठे कमी पडलो, माझी काय चूक आहे ? आपल्या मनात माझ्याबद्दल राग आहे का ? उद्धव ठाकरेंना वेळ मागितली आहे.

कोण कोण आहेत नाराज आमदार ?
सुनिल राऊत, सुनिल प्रभू, रविंद्र वायकर, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, रामदास कदम, दिवाकर रावते, दिपक केसरकर, अनिल बाबर, प्रकाश अबिटकर, संजय शिरसाट, तानाजी सावंत, संजय रायमुलकर, आशिष जैस्वाल

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?