‘मॅच’ हरल्यानंतर आमिर खान, ईशा गु्प्ता, रणदीप हुड्डा आणि बोमन इराणी यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप सेमीफायनल मॅचमध्ये न्यूझिलंडने भारताचा १८ धावांनी पराभव केला आणि फायनलमध्ये आपली जागा कायम केली. भारताने मॅच हरल्यानंतर आता विशेष कामगिरी न करू शकणाऱ्या फलंदाजांवर टीका सुरु असल्याचे दिसत आहे. अशात क्रिकेटप्रेमी आणि टीम इंडिया समर्थक हे टीमची बाजू घेत आहेत. यात क्रिकेटप्रेमींसोबतच राजकीय नेते आणि बॉलिवूडमधील कलाकारही आहेत.

मॅचनंतर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये आमिरने टीम इंडियाचे कौतुक केले आहे. आपल्या ट्विटमध्ये आमिर खान म्हणतो की, “विराट आज नशीब आपल्यासोबत नव्हतं. आजचा दिवस आपला नव्हता. ज्या दिवशी भारताने सेमीफायनलमध्ये एन्ट्री केली आणि गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले तेव्हाच माझ्यासाठी टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता. पूर्ण स्पर्धेत तुम्ही चांगले खेळलात. परवा जर पाऊस पडला नसता तर कालचं चित्र काही वेगळं असलं असतं. तम्ही शानदार प्रदर्शन केलं आहे. मला तुमच्यावर गर्व आहे.”

https://twitter.com/aamir_khan/status/1148967768269549569

ईशा गुप्तानेही इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ईशा म्हणते की, “तुम्ही चांगली लढत दिलीत, परंतु हा खेळ आहे, त्यात तुम्ही कधी हारता कधी जिंकता. परंतु तु्म्ही आम्हाला अभिमान वाटेल अशी कामगिरी नक्कीच केली आहे. धन्यवाद टीम इंडिया.”

https://www.instagram.com/p/BzvbMynAgmC/?utm_source=ig_embed

रणदीप हुड्डाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “हार्ड लक टीम इंडिया. खूप उत्साही खेळ खेळलात. धोनीची विकेट आणि तो परत येणं मला दु:खी करणारं होतं. तुमचा अभिमान वाटतो.”

याशिवाय बोमन इराणी यांनीही ट्विट करत म्हटले आहे की, “कोहलीला पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना पाहतोय. तो खूप संयमाने ,शांततेत आणि हुशारीने सर्वांना उत्तर देत आहे. तो आपले तेथील काम उत्तम प्रकारे करत आहे. खूपच अवघड असेल. ग्रेट जॉब विराट.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ट्विट करत त्यांनी म्हटले आहे की, “मॅचचा रिजल्ट नाराज करणारा असला तरी, ज्या पद्धतीने टीमने लढत दिली ते खरंच पाहण्यासारखं होतं. मॅचमध्ये ज्या पद्धतीने भारताने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केले ते खरंच अभिमान वाटण्यासारखं आहे. जिंकणे किंवा हारणे हा जीवनाचा एक भाग आहे. भविष्यातील प्रयत्नांसाठी टीम इंडियाला शुभेच्छा.”

 

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

बीट खाल्याचे ‘हे’ चमत्कारिक फायदे ; ‘खुंटते कॅन्सरग्रस्त कोशिकांची वृध्दी’, जाणून घ्या

लहान मुलांना दुधीदात येत असताना होणाऱ्या त्रासावर करा ‘हे’ ५ उपाय