‘सिक्सर किंग’ युवराज सिंगने निवृत्‍तीची घोषणा केल्यानंतर ‘ही’ अभिनेत्री झाली ‘इमोशनल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 17 वर्षांच्या मोठ्या आणि यशस्वी करिअर नंतर भारताचा दमदार क्रिकेटर युवराज सिंगने सोमवारी(दि 10 जून) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 37 वर्षीय युवराज सिंगने काल इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. त्यानंतर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली, अनेकांना यामुळे वाईट वाटले.

तुम्हाला सांगू इच्छितो की, युवराज सिंगच्या नावावर एक ओव्हरमध्ये सहा छक्के मारण्यापासून ते विश्वचषकात मॅन ऑफ द सीरीजचा किताब जिंकण्यापर्यंत अनेक शानदार रेकॉर्ड आहेत. याशिवाय कोणत्या एखाद्या मॅचसाठी त्याची सर्वात जास्त आठवण केली जात असेल तर ती आहे नॅटवेस्ट सीरीजची फायनल. युवराजचे सर्व कारनामे पाहता त्याला इंडियन क्रिकेटचा हिरो म्हणून संबोधित केले आहे.

तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगू इच्छितो, कदाचित तुम्हाला माहिती नसेल परंतु बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या लवस्टोरीचे कारणही युवराज सिंगच आहे. या दोघांची भेट युवराज सिंगच्या पार्टीतच झाली होती. यानंतर हे दोघे एकमेकांना डेट करू लागले. त्यानंतर दोघेही विवाहबद्ध झाले होते. तुम्हाला सांगू इच्छितो की, हेजल कीच ही बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते. नेहा आणि युवराज दोघे चांगले मित्र आहेत.

युवराजची जवळची मैत्रीण असणाऱ्या नेहा धुपियाने क्रिकेटर युवराज सोबतचे काही फोटो शेअर करत एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये नेहा म्हणते की, “आम्ही तुला खेळाच्या मैदानावर खूप मिस करू. परंतु माझ्या दोस्ता तू नेहमीच माझा हिरो आहेस आणि नेहमीच राहशील.”

आरोग्य विषयक वृत्त –

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

You might also like