मनोरंजन

सनी लिओनीनंतर ‘पॉर्न’ स्टार मिया करणार सिनेमात काम ! रामगोपाल वर्मांनी शेअर केला ‘बोल्ड’ टीजर (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –वादग्रस्त ट्विट्समुळं नेहमीच चर्चेत राहणारे फिल्ममेकर रामगोपाल वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे त्यांचा सिनेमा आहे. क्लायमॅक्स असं या सिनेमाचं नाव आहे. खास बात अशी की, या सिनेमात त्यांच्यासोबत अमेरिकन पॉर्न स्टार मिया माल्कोवा काम करताना दिसणार आहे. क्लायमॅक्स सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. सध्या या टीजरची खूप चर्चा सुरू आहे.

रामगोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर क्लायमॅक्सचा टीजर शेअर केला आहे. याबद्दल माहिती देताना त्यांनी लिहिलं की, हा एक भयानक अॅक्शन थ्रिलर सिनेमा आहे. याचा बॅकड्रॉप एक वाळवंट आहे. आरएसआर प्रॉडक्शन हा सिनेमा प्रोड्युस करत आहे.” यात मियाचे अनेक बोल्ड सीन्स आहेत.

वर्मांनी मियाच्या अ‍ॅक्टींगचं कौतुक करत लिहलं की, “सिनेमात मियाची अ‍ॅक्टींग पाहून तुम्ही नक्कीच चकित व्हाल.” टीजरमधन अशी माहिती देण्यात आली आहे की, सिनेमाचा ट्रेलर 18 मे रोजी सकाळी 9.30 वा रिलीज होणार आहे.

सनी लिओनीनंतर आता मिया माल्कोवा ही दुसरी अ‍ॅडल्ट स्टार आहे जिला रामगोपाल वर्मांकडून शुट केलं आहे. 2018 मध्ये गॉड सेक्स अँड ट्रुथ या अ‍ॅडल्ट डॉक्युमेंट्रीचे काही फोटो तिनं शेअर केले होते. याची शुटींग रामागोपाल वर्मांनी केली होती.

Back to top button