‘ठग्स’ च्या अपयशानंतर आमिर घेत आहे ‘या’ चित्रपटासाठी मेहनत 

मुंबई : वृत्तसंस्था – आमिरच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या परंतु या चित्रपटाने सगळ्यांच्या अपेक्षा निराशा केल्या. आमिरने या चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत सगळ्यांची माफीही मागितली. या चित्रपटाच्या अपयशानंतर आता आमिर ‘गजनी 2’ या चित्रपटाच्या शूटिंगची तयारी करत आहे. गेल्या काही दिवसापासून आमिर आपल्या शरीरावर प्रचंड मेहनत घेत आहे. आणि ती मेहनत ‘गजनी 2’ या चित्रपटाची तयारी असावी, असे मानले जात आहे.

‘गजनी’च्या मेकर्सनी अलीकडे ‘गजनी 2’ हे टायटल रजिस्टर केले आहे. हिंदी आणि तेलगू भाषेत हे टायटल रजिस्टर करण्यात आले असून हे टायटल रजिस्टर झाल्यानंतर ‘गजनी 2’ची प्लानिंग होतेय, हे नक्की. ‘गजनी’ हा चित्रपट ए.आर मुरगदास यांनी दिग्दर्शित केला होता. पण ‘गजनी 2’ हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार हे अजून कळाले नाही.

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ फ्लॉप ठरल्यानंतर आमिरला एका हिट चित्रपटाची गरज आहे. ‘गजनी’ चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता त्यामुळे ‘गजनी 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय जादू दाखवेल हे तर वेळच सांगेल, पण आमिरने मात्र यासाठी मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like