शिवसेनेचे वरूण सरदेसाई म्हणाले – ‘Google वर खंडणी टाका सगळं कळेल’; मनसेेचे संदीप देशपांडेंनी सांगितलं – ‘गुगल सब जानता है !’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  खरे वीरप्पन कोण, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. आपल्यालाही माहिती करुन घ्यायचे असेल तर ‘मनसे खंडणी’ असे फक्त google search करुन बघावे. Google च्या पहिल्याच पेजवर या बातम्या सापडतील, असे ट्विट शिवसेनेच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केले होते. त्यावर आता पुन्हा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. वरुण सरदेसाई म्हणाले, गुगल वर खंडणी टाका सगळ कळेल, आम्ही टाकून बघितल, असे म्हणत गुगल सब जानता है, असे देशपांडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि मनसेमध्ये ट्विटर वॉर चांगलच रंगणार असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई महापालिकेत विरप्पन गँग काम करत आहे. ही विरप्पन गँग महापालिकेची भरमसाठ लूट करत आहे. अनेक घोटाळे केले जात आहेत. तसेच स्थायी समितीची कामेही याच गँगला दिली जात आहेत. आता अशा गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल, असे म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली होती. देशपांडे यांच्या टीकेला शिवसेनेच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी देखील प्रत्युत्तर दिले होते.

वरुण सरदेसाई यांनी ट्विट करून म्हटले आहे की, खरे वीरप्पन कोण, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. आपल्यालाही माहित करुन घ्यायचे असेल तर ‘मनसे खंडणी’ असे फक्त google search करुन बघावे. Google च्या पहिल्याच पेजवर या बातम्या सापडतील. सगळ्या बातम्या वेगवेगळ्या आहेत, पण प्रत्येक जिल्हातील यांची स्टोरी सेम टू सेम आहे. सरदेसाईंनी ट्विटमध्ये काही बातम्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. त्यांच्या या टीकेला मनसे नेते देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान रस्त्यांचा घोटाळा, नालेसफाईचा घोटाळा किंवा आता कोरोनाच्या काळातील घोटाळा असे किती तरी घोटाळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केले आहेत. जनतेला जर यातून दिलासा द्यायचा असेल तर यांचा वध करावाच लागेल. यासाठी मनसे पुढाकार घेईन, असा निर्धारही संदीप देशपांडे यांनी सांगितले.