हेरॉइनहून अफू बरी, कायदेशीर करा : नवज्योत सिंग सिद्धू 

ADV
पंजाब : वृत्तसंस्था 

काही दिवसांपूर्वी सिद्धू यांच्या पाकिस्तान भेटीवरून सर्व स्तरातून  टिका होत होत्या . हे प्रकरण संपते न संपते तोपर्यंत आता नवज्योत सिंग सिद्धू एका नव्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत . आता “हेरॉइनपेक्षा अफू बरी आहे आणि पंजाबमध्ये अफूला कायदेशीर मान्यता द्यायला हवी” असं धक्कादायक विधान काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी केलं आहे. सिद्धू यांनी हे विधान केलं तेव्हा चंडीगडचे डीजीपीही उपस्थित होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’18ea8a10-c566-11e8-9f48-f9f1019a0df7′]

पंजाबमध्ये ड्रग्सची मोठ्या प्रमाणात तस्करी झाल्यामुळे तेथील युवक व्यसनाधीन झाला. या ड्रग्सच्या अवैध व्यवसायामुळेच अकाली दल-भाजप सरकारचा पाडाव झाला होता. कॅप्टन(नि) अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार पंजाबमध्ये ड्रग्जची तस्करी करण्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा कायदा करण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थिती सिद्धू यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सगळीकडूनच टीकेची झोड उठते आहे.
ADV

पंजाबमध्ये अफू कायदेशीर करायला हवी. इतकच नाही पंजाब अफूच पीक उगवायला हवं. ते अत्यंत नफा मिळवून देईल’ असंही सिद्धू म्हणाले.

प्रिया दत्त यांना काँग्रेसच्या सचिवपदावरुन हटवलं


‘माझे काकाही अफू घ्यायचे’ 

अफू कायदेशीर होण्यासाठी आप नेता धर्मवीर सिंह यांनी चळवळ पंजाबमध्ये उभी केली आहे. याबद्दल बोलताना सिद्धू म्हणाले,’ही अत्यंत चांगली चळवळ आहे. माझे काकाही शेवटपर्यंत अफू घ्यायचे. अफूमध्ये अनेक औषधी गुण असतात’. आता सिद्धू यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस सरकार काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जाहीरात