Ahmednagar ACB Trap | जीएसटी नंबर पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी लाचेची मागणी, महिला राज्यकर अधिकारी गोत्यात, एसीबीकडून FIR

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – व्यवसायासाठीचा असलेला GST नंबर पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी चार हजार रुपये लाच मागणाऱ्या अहमदनगर सेवा कर विभागाच्या (Service Tax Department) राज्यकर अधिकारी (State Revenue Officer) सारिका जयवंत निकम Sarika Jaywant Nikam (वय-39) यांच्यावर अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Ahmednagar ACB Trap) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. अहमदनगर एसीबीच्या पथकाने (Ahmednagar ACB Trap) बुधवारी (दि.21) भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथील 30 वर्षीय व्यावसायिकाने अहमदनगर एसीबीकडे (Ahmednagar ACB Trap) 17 ऑक्टोबर 2022 रोजी तक्रार केली होती. तक्रारदार यांचा व्यवसायासाठीचा असलेला GST नंबर रिटर्न फाईल न केल्यामुळे जुलै 2022 मध्ये रद्द करण्यात आला होता. तो पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी तक्रारदार यांनी सारिका निकम यांना भेटून अर्ज दिला. मात्र त्यांनी तो अर्ज न स्वीकारता GST नंबर पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी 5 हजार रुपये लाच मागणी (Demanding Bribe) केली. याबाबत तक्रारदार यांनी अहमदनगर एसीबीकडे तक्रार दिली होती.

 

अहमदनगर एसीबीच्या पथकाने 17 ऑक्टोबर 2022 रोजी पडताळणी केली असता सारिका निकम
यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 4 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
बुधवारी सारिका निकम यांच्यावर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन (Bhingar Camp Police Station) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde)
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक हरिष खेडकर (DySP Harish Khedkar)
पोलीस अंमलदार चौधरी, सचिन सुद्रुक,राधा खेमनर, संध्या म्हस्के, तागड यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Ahmednagar ACB Trap | Bribe demand for re-activation of GST number, female state tax officer on the dock, FIR by ACB

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uday Samant | आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी फेब्रुवारीत ‘ट्रायबल इंडस्ट्रियल पार्क’ – उद्योगमंत्री उदय सामंत

Aaditya Thackeray | राहुल शेवाळेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी आणि मुख्य…’

Raj Thackeray | सोशल मिडीया वापरावरून राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना खडे बोल; म्हणाले…