अहमदनगर : महासभेत महाभाग छिंदमची हजेरी, महासभेत गोंधळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

छत्रपती शिवाजी महाराजांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी महाभाग छिंदमला उपमहापौर पदावरुन काढून टाकण्यात आले होते. या प्रकारानंतर छिंदमने आज महापालिकेच्या महासभेत हजरी लावली. त्यामुळे सभागृहामध्ये गोंधळ निर्माण झाला. छिंदमने हजेरी लावताच नगरसेवकांनी घोषणाबाजी करत विरोध केला. छिंदमने दिलेले निवेदन स्वीकारु नये, अशी मागणी सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी केली.

छिंदमला मागच्या दारातून सभागृहात आणल्यामुळे नगरसेवकांनी महापौर सुरेखा कदम यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला. दरम्यान छिंदमने अधिकृत हजेरी लावल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्तात छिंदमला सभागृह व महापालिकेबाहेर बाहेर नेले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने सभा तहकूब करण्याची मागणी केली आहे.
[amazon_link asins=’B01J7F4AC2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’58aecf8b-9633-11e8-a5ca-59726084cb0d’]
शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या छिंदमला महापालिका सभेत उपस्थित राहण्यासाठी पोलिस बंदोबस्त दिल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमींकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी महापालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी केली गेली. याप्रकरणी गोरख दळवी यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महापालिकेची सभा आज दुपारी होणार असून या सभेला श्रीपाद छिंदम उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावेळी त्याला पोलिस बंदोबस्त दिला गेला आहे. याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड आणि शिवप्रेमींकडून निदर्शने करण्यात आली. तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.