×
HomeशहरअहमदनगरAhmednagar Crime | धक्कादायक ! मोबाईल दिला नाही म्हणून पत्नीवर भररस्त्यात सपासप...

Ahmednagar Crime | धक्कादायक ! मोबाईल दिला नाही म्हणून पत्नीवर भररस्त्यात सपासप वार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन पत्नीने आपला मोबाईल लपवून ठेवल्याच्या आणि मागणी करुनही मोबाईल देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने भररस्त्यात पत्नीचा भोसकून (Ahmednagar Crime) खून केला. तर मेहुणीवर हल्ला करुन जखमी केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar Crime) कर्जत तालुक्यातील राशीन (Rashin Karjat taluka) गावात घडली आहे. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मेहुणीवर देखील आरोपीने हल्ला करुन जखमी केले. घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपी पतीला पोलिसांनी काही तासात अटक (Arrest) केली आहे.

 

राशीन येथील सिद्धटेक रस्त्यावर ही घटना घडली. आरोपी राहुल सुरेश भोसले Rahul Suresh Bhosale (रा. पांडे, ता. करमाळा) याचे त्याची पत्नी दिपाली हिच्यासोबत भांडण झाले होते.
या रागातून त्याने पत्नीवर चाकूने हल्ला (husband attacked wife) केला. यामध्ये एक वार गळ्यावर केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
सोबत असलेल्या तिच्या बहिणीवरही आरोपीने वार केल्याने ती जखमी झाली. नागरिकांना काही कळायच्या आतच भर रस्त्यात हा थरार झाला.
आरोपीची मेहुणी लता बारकू आढाव (वय-23) हिने याबाबत फिर्याद दिली.

 

मयत दिपाली आणि जखमी लता या दोघी राशीन येथील कामाच्या ठिकाणी जात होत्या. त्यावेळी आरोपी समोरून आला. त्याने दिपालीकडे मोबाईल मागितला.
यावरुन दोघांत वाद झाले. दिपालीने मोबाईल आपल्याकडे नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने दिपालीला थप्पड मारली.
त्यानंतर त्याने चाकूने सपासप वार केले. एक वार तिच्या गळ्यावर बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
तसेच ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या लता यांच्यावर देखील आरोपीने वार केले.
लता यांच्या पोटावर वार केला.

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव (Police Inspector Chandrasekhar Yadav) यांनी घटनास्थळी येऊन आरोपीचा शोध सुरु केला.
दरम्यान आरोपी दौंडच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तीन पथके तयार करुन करमाळा, दौंड आणि पुण्याच्या दिशेने रवाना केली.
संध्याकाळी सहाच्या सुमारास कर्जत पोलिसांनी (Karjat police) आरोपीला बेड्या ठोकल्या.

 

Web Title : ahmednagar crime | husband attacked wife on road for not giving mobile wife died in nagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Men’s Health | पुरुषांनी पुरूषांनी ‘या’ 7 गोष्टींचं सेवन आवश्य करावं; टेस्टोस्टेरोन लेव्हल वाढल्याने सेक्स लाईफ चांगली, जाणून घ्या

Bitcoin Price | 2021 मध्ये 1 लाख डॉलरपर्यंत जाईल Bitcoin ची Price, एक्सपर्टने केला दावा

Maharashtra School Reopen | शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून इयत्ता 1 ली ते 4 थी ची शाळा सुरू होण्याचे संकेत 

Must Read
Related News