Ahmednagar News | मामाला अडकविणार्‍या भाच्याची ‘हुश्शार’ मामीनं केली ‘फजिती’ अन् फोडलं ‘बिंग’, अहमदनगर जिल्ह्यातील घटना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा तालुक्यातील घोडगाव येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शेतीतला भाग मिळत नाही म्हणून खोटी तक्रार करून भाच्याने मामाला अडकवण्याचा प्रयत्न केलाय.
मामीच्या जबाबावरून भाच्याने रचलेला कट उघडकीस आला आहे. मात्र, आपण या प्रकरणात अडकत असल्याचे समजताच भाचा फरार झाला आहे.
या प्रकरणावरून karjat कर्जत karjat पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीनुसार, सागर शंकर निंबोरे (वय, 30 रा.घोडगाव ) असे त्या भाच्याचे नाव आहे.
याने कर्जत karjat तालुक्यात दुरगाव फाटा येथे दुचाकीवर आलेल्या दोघांनी आपल्याला अडवून मारहाण केली.
आणि आपल्याकडील मोबाईल आणि 1 लाख रुपये चोरून नेल्याची खोटी फिर्याद 27 मेच्या रात्री कर्जत पोलिस ठाण्यात दिलीय.
तर निंबोरे याच्या बाबत पोलिसांना संशय आल्याने त्याचीच चौकशी सविस्तर केल्यानं निंबोरे याच्याविरुद्ध खुनासह दरोडा,
फसवणूक, चोरी असे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तसेच निबोरे यांनी त्याचा मामा गोरख नभाजी दरेकर यांच्यावर संशय असल्याची तक्रार केली. यावरून पोलिसांनी मामाची चौकशी केली असता सत्यता समोर आली.

सागर निंबोरे (भाचा) हा 25 मे रोजी (मामा) गोरख दरेकर यांच्या घरी आला होता.
त्याने दरेकर यांचा गतीमंद मुलगा दीपक याला मोबाईल चोरीचा आळ घेऊन मारहाण केली होती. त्याच्यावरील वण देखील पोलिसांनी बघितले. मोबाईलसाठी निंबोरे याने घराची झडती घेतल्याचेही सांगितले.
अशी माहिती त्याची मामी नंदाबाई दरेकर यांनी दिली.
अधिक चौकशीनंतर समजले की त्याचे मामा-मामी शेताच्या वाट्याचे पैसे देत नाहीत,
याचा राग त्याला होता. त्याच रागातून त्याने मामाला अडकविण्याचा कट रचला होता.
अशी चौकशी सुरू असताना आता आपण रचलेला कट वर येतोय हे समजताच सागर निंबोरे हा तेथूनच पसार झाला.
यावरून पोलिसांनी त्याच्याविरुद्धच बनाव रचून पोलिसांना कामाला लावल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या दरम्यान, निंबोरे यांनी बँकेतून पैसे काढून एका नातेवाईकांकडून ठेऊन पैसे चोरी गेल्याचे सांगितले.
मोबाईलमुळे तपास होऊन मामा पकडला जावा, म्हणून खोटा कट रचण्याआधी मामाच्या घरी जाऊन त्याने आपल्याकडील मोबाईल मामाच्या घरी गुपचूप ठेवला होता.
याचे कारण चोरांनी मोबाईल नेला आहे असा.
आणि तपासामध्ये तो मोबाईल मामाच्या घरी सापडावा असा खोटा कट निंबोरे यांनी रचला होता. मात्र सगळा प्रकार त्याच्या मामींनी सांगितल्याने हा प्रकार उघड झाला आहे.
आता सागर निंबोरे हा गुन्ह्यात अडकला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत