Air pollution | रिपोर्टमध्ये झाला आश्चर्यकारक खुलासा ! वायु प्रदूषणामुळे भारतातील लोकांचे वय होतंय 9 वर्षांनी कमी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Air pollution | अमेरिकन संशोधन गटा (American Research Group) ने बुधवारी जारी केलेल्या रिपोर्टनुसार, वायु प्रदूषणाने (Air pollution) जवळपास 40% भारतीयांच्या जीवनातील नऊ वर्षापेक्षा जास्त वर्ष कमी होत आहेत. शिकागो विद्यापीठा (University of Chicago) मध्ये एनर्जी पॉलिसी इन्स्टीट्यूट (Energy Policy Institute – EPIC) द्वारे तयार करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, नवी दिल्लीसह मध्य, पूर्व आणि उत्तर भारताच्या विस्तीर्ण प्रदेशात राहणार्‍या 480 मिलियनपेक्षा जास्त लोकांना प्रदूषणाचा उच्च स्तर सोसावा लागतो.

EPIC च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, चिंताजनक प्रकारे भारतात वायु प्रदूषणाच्या उच्च स्तराचा भौगोलिक प्रकारे काळाच्या ओघात विस्तार झाला. उदाहरणार्थ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात हवेची गुणवत्ता खुप खराब झाली आहे.

धोकादायक प्रदूषण स्तरावर लगाम लावण्यासाठी 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या भारताच्या राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमाचे (NCAP) कौतूक करत EPIC रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, NCAP लक्ष्य प्राप्त करणे आणि कायम राखणे यामुळे देशातील लोकांचे जीवन 1.7 वर्ष आणि नवी दिल्लीचे 3.1 वर्षांनी वाढेल.

स्विस समूह आयक्यू एअरनुसार, नवी दिल्ली लागोपाठ तिसरे वर्ष 2020 मध्ये जगातील सर्वात प्रदूषित राजधानी होती.
फुफ्फुसाचे नुकसान करणार्‍या कणांच्या एकाग्रतेच्या आधारवर हवेच्या गुणवत्तेचा स्तर मोजला जातो, ज्यास पीएम 2.5 म्हणून ओळखले जाते.

मागील वर्षी नवी दिल्लीच्या 20 मिलियन नागरिकांनी कोरोना व्हायरस लॉकडाउन प्रतिबंधांमुळे उन्हाळ्यात सर्वात चांगल्या हवेत श्वास घेतला,
त्यांना पंजाब आणि हरियाणाच्या जवळपासच्या राज्यांत शेतात तरवा जाळण्यात वाढ झाल्याने हिवाळ्यात विषारी हवेला तोंड द्यावे लागले.

Web Title : Air Pollution | shocking disclosure report lives people india are being reduced 9 years due air pollution

Pune Crime | ‘पप्पी दे’ असे म्हणत घरात घुसून अश्लील कृत्य करत 16 वर्षीय मुलीचा 26 वर्षीय युवकाकडून विनयभंग

5 Money Task | डायरीत नोंद करा 30 सप्टेंबरची तारीख, ‘या’ महिन्यात ‘ही’ सर्व कामे पूर्ण करण्याची आहे डेडलाइन; जाणून घ्या

‘e-SHRAM’ च्या वेबसाइटवर या लोकांनी आवश्य करावे रजिस्ट्रेशन, थेट खात्यात येऊ लागतील सरकारी पैसे; जाणून घ्या

Gold Price Today | किमतीमधील हालचालीने गुंतवणुकदारांमध्ये गोंधळ ! आता ‘या’ कॅरेटचं सोनं 27635 रुपयात 10 ग्रॅम, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update