Airtel युजर्ससाठी खुशखबर ! आता मिळणार 6 GB पर्यंतचे Free Data Coupons, ‘असा’ घ्या लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम कंपनी Airtel नं आपल्या युजर्ससाठी खास ऑफरची घोषणा केली आहे. यात प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर ग्राहकांना 6 जीबी पर्यंतच्या डेटाचं कूपन फ्री मध्ये मिळणार आहे. हे Airtel Free Data Coupons मिळवण्यासाठी खास काही करण्याचीही गरज नाही. ग्राहकांना केवळ 219 रुपयांच्या सुरुवातीच्या प्रीपेड रिचार्ज सोबत आणखी काही रिचार्जवर फ्री कूपन मिळू शकतं. याची आपण सविस्तर माहिती घेऊयात.

या रिचार्जवर मिळणार लाभ
जर एअरटेल युजर 28 दिवसांची वैधता असलेला प्लॅन खरेदी करत असेल तर तो प्लॅन अनलिमिटेड आणि त्यावर त्यांना एक एक जीबीचे 2 कूपन फ्री मिळतात. यात 219 रुपये, 249 रुपये, 279 रुपये, 289 रुपये, 298 रुपये, 349 रुपये, आणि 448 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.

जर युजर 56 दिवसांच्या वैधतेचा रिचार्ज करत असतील तर त्यांना एक एक जीबीचे 4 कपून फ्री मिळतात. या प्लॅनमध्ये 399 रुपये, 449 रुपये, 558 रुपये आणि 599 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. म्हणजेच ग्राहकांना यात 4 जीबी पर्यंत डेटा फ्री मिळणार आहे.

जर युजरनं 84 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनचा रिचार्ज केला तर त्यांना एक एक जीबीचे 6 डेटा कूपन फ्री मध्ये मिळतील. यात 598 रुपये आणि 698 रुपयांच्या रिचार्जचा समावेश आहे.

जेव्हा ग्राहक वरील पैकी एका रकमेचा रिचार्ज करतील तेव्हा डेटा कूपन त्यांच्या अकाऊंटमध्ये क्रेडिट होईल. एअरटेलची ही ऑफर घेण्यासाठी सर्वात मोठी अट म्हणजे युजर्सला Airtel Thanks मोबाईल ॲपवरून हे प्रीपेड रिचार्ज करावं लागणार आहे. ॲप डाऊनलोड केल्यानंतर My Coupons सेक्शनमध्ये जाऊन ग्राहक कपूनला रिडीम करू शकतात त्यात त्यांना कपूनच्या वैधतेसंबंधित माहितीही दिली जाते.