‘Airtel’कडून ‘धमाकेदार’ प्रीपेड प्लॅन लॉन्च, मिळणार 1 वर्षाची ‘वैधता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Airtel ने पुुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी नवे प्लॅन लॉन्च केले आहेत. नुकतेच कंपनीने नवा प्री पेड प्लॅन लॉन्च केला आहे, या प्लॅनची वैधता 365 दिवस असणार आहे. कंपनीने हा प्लॅन त्या ग्राहकांसाठी लॉन्च केला आहे ज्यांना जास्त वैधता आणि डाटा मिळणारा प्लॅन हवा असतो.

1,699 रुपयांचा प्लॅन –
या प्लॅनमध्ये दररोज 1.4 जीबी डाटा मिळेल. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची असेल. यात रोज 100 मेसेज मिळतील. यात ग्राहकांना विंक म्यूझिक, एअरटेल एक्सट्रीम प्रीमियम आणि नॉर्टन मोबाइल सिक्युरिटी मिळेल. ज्याची वैधता 1 वर्षापर्यंंत असेल.

998 रुपयांचा प्लॅन –
याची वैधता 336 दिवसांची असेल आणि या प्लॅनमध्ये एकूण 12 जीबी डाटा मिळेल. या प्लॅनमध्ये 28 दिवसांपर्यंत 300 मेसेज मिळतील. यात ग्राहकांना विंक म्यूझिक, एअरटेल एक्सट्रीम प्रीमियम आणि नॉर्टन मोबाइल सिक्युरिटी मिळेल. ज्याची वैधता 1 वर्षापर्यंत असेल.

597 रुपयांचा प्लॅन –
या प्लॅनची वैधता 169 दिवसांची आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये 6 जीबी डाटा मिळतो. यात 300 मेसेज आणि अनलिमिडेट कॉलिंग मिळेल. ही कॉलिंग आणि मेसेजची सुविधा 28 दिवसांसाठी असेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना विंक म्यूझिक, एअरटेल एक्सट्रीम प्रीमियम आणि नॉर्टन मोबाइल सिक्युरिटी मिळेल. ज्याची वैधता 1 वर्ष असेल.