Airtel Thanks App डाउनलोड करा आणि मिळवा 5GB डेटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारती एअरटेल ( Airtel) कंपनीने (‘New 4G SIM or 4G Upgrade Free Data Coupons’) या नावाने एक ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये नवीन एअरटेल ग्राहकांना (Customer) ५ जीबी डेटा (Data) देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन एअरटेल युजर्संना (Users) पहिल्यांदा एअरटेल थँक्स हे ॲप (Airtel Thanks App) डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर त्यांना १ GBचे ५ कूपन मिळतील. एअरटेलकडून त्या ग्राहकांना हा ५ GB डेटा देण्यात येत आहे. ज्यांनी नवीन ४ जी सिम खरेदी केले आहे किंवा ४ जी डिव्हाइसवर अपग्रेड केले आहे. तुम्हाला पहिल्यांदा प्रीपेड मोबाइल नंबरचा वापर करून एअरटेल थँक्स ॲपवर रजिस्ट्रेशन करावे लागेल. ३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत भारती एअरटेलने ४ वर्षांत पहिल्यांदा रिलायन्स जिओपेक्षा जास्त ४ जी सब्सक्रायबर्स जोडले आहे.

असा मिळणार ५ GB डेटा
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रीपेड ४ जी सब्सक्रायबर्सला गुगल प्ले स्टोरवरून एअरटेल थँक्स या ॲपचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करून युजरला मोबाईल नंबरने रजिस्टर करावे लागेल. एअरटेल कंपनीच्या म्हण्यानुसार, प्रत्येक युजरच्या अकाउंटमध्ये ७२ तासांच्या आत १ जीबीचे पाच कूपन क्रेडिट करण्यात येतील. ही ऑफर मिळवण्यासाठी काही नियम व अटीसुद्धा आहेत. या ऑफरसाठी एक मोबाईल नंबर एकदाच वापरता येणार आहे. एअरटेलने हेसुद्धा सांगितले आहे की जर यूजर ५ जीबी डेटा फ्री मिळवण्यात योग्य असेल, तर आता मिळत असलेला २ जीबी डेटा फ्री ऑफर बंद होईल.

एअरटेलकडून सांगण्यात आले की तुम्ही जर ५ GB च्या ऑफरसाठी क्वॉलिफाइ झाला तर ऑटोमेटिकली कूपन क्रेडिट झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाइलला येईल. एसएमएस आल्यानंतर एअरटेल थँक्स ॲपच्या माय कूपन्स सेक्शनमध्ये जाऊन आपले कूपन व्ह्यू करून क्लेम करावे. क्रेडिट झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत १ जीबीचे कूपन रिडिम करण्यात येईल. या कूपनची वैधता ३ दिवस असणार आहे. ३ दिवसांच्या आत तुम्हला हे कूपन एअरटेल थँक्स ॲपवरून क्लेम करावे लागेल, अन्यथा ३ दिवसांनी ते आपोआप एक्सपायर होईल.

You might also like