Airtel: ‘या’ प्रीपेड प्लॅन्समध्ये दररोज मिळतो 1.5GB डेटा, किंमत 300 रुपयांपेक्षा कमी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : एअरटेल आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे प्रीपेड प्लॅन्स ऑफर करत असतो. हे प्लॅन्स वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या गरजेनुसार ऑफर केले जातात. सध्या आम्ही आपल्याला कंपनीच्या 1.5GB डेली डेटाच्या त्या प्लॅन्सबाबत सांगणार आहोत, जे 300 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. हे प्लॅन्स खूप लोकप्रिय आहेत. या प्लॅन्समध्ये डेटासह इतर बरेच फायदे देखील मिळतात.

299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात ग्राहकांना दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS दिले जातात. याबरोबरच प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन, एअरटेल एक्सट्रीम प्रीमियम, फ्री हॅलोट्यून्स, फ्री विंक म्युझिक, FASTag वर 100 कॅशबॅक आणि फ्री ऑनलाईन कोर्सेसदेखील 28 दिवसांसाठी दिले जातात.

289 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
हा प्लॅन देखील 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात ग्राहकांना दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS दिले जातात. याबरोबरच यामध्ये 30 दिवसांसाठी प्राइम व्हिडिओ मोबाईल एडिशनची फ्री ट्रायल, 28 दिवसांसाठी जी5 प्रीमियम सबस्क्रिप्शन, एअरटेल एक्सट्रीम प्रीमियम, फ्री हॅलोट्यून्स, फ्री विंक म्युझिक, फ्री ऑनलाईन कोर्सेस आणि FASTag वर 100 रुपये कॅशबॅक देण्यात येतो.

279 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
हा प्लॅन देखील 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS दिले जातात. यासह, यामध्ये ग्राहकांना प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनची 30 दिवसांची फ्री ट्रायल, HDFC चा 4 लाख रुपयांचा लाइफ इन्शुरन्स, एअरटेल एक्सट्रीम प्रीमियम, फ्री हॅलोट्यून्स, फ्री विंक म्युझिक, फ्री ऑनलाईन कोर्सेस आणि FASTag वर 100 रुपये कॅशबॅक देण्यात येतो.

249 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
कंपनीचा हा प्लॅन देखील 28 दिवसांच्याच वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS दिले जातात. यासोबतच ग्राहकांना प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनची 30 दिवसांची फ्री ट्रायल, एअरटेल एक्सट्रीम प्रीमियम, फ्री हॅलोट्यून्स, फ्री विंक म्युझिक, 1 वर्षासाठी नि:शुल्क ऑनलाईन कोर्सेस आणि FASTag वर 100 रुपये कॅशबॅक देखील देण्यात येतो.